बँकिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या पदवीधरांसाठी देशातील सर्वात मोठी सार्वजनिक (great opportunity) क्षेत्रातील बँक State Bank of India (SBI) ने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. एसबीआयमध्ये ‘सर्कल बेस्ड ऑफिसर’ (CBO) पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी १८ फेब्रुवारी २०२६ ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली होती; मात्र उमेदवारांचा वाढता प्रतिसाद आणि तांत्रिक कारणांचा विचार करून आता अर्ज करण्यासाठी २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेद्वारे देशभरातील विविध सर्कल्समध्ये एकूण २२७३ रिक्त पदे (great opportunity) भरली जाणार आहेत. त्यापैकी २०५० पदे नियमित स्वरूपाची असून २२३ पदे मागील वर्षांतील शिल्लक आहेत. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध आहेत. महाराष्ट्र सर्कलमध्ये १९४ पदे, तर मुंबई मेट्रो सर्कलमध्ये (मुंबई आणि गोवा) १४३ पदे भरली जाणार आहेत. याशिवाय अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, चंदीगड, चेन्नई, उत्तर पूर्व, हैदराबाद, जयपूर, कोलकाता, लखनऊ आणि नवी दिल्ली अशा एकूण १६ सर्कल्समध्ये ही भरती होणार आहे.

या पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून (great opportunity) कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. वैद्यकीय, अभियांत्रिकी, चार्टर्ड अकाउंटंट यांसारख्या व्यावसायिक पदवीधारकांनाही अर्ज करण्याची संधी आहे. उमेदवाराला ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत कोणत्याही अनुसूचित व्यावसायिक बँकेत किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकेत अधिकारी म्हणून किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा ३१ डिसेंबर २०२५ रोजी २१ ते ३० वर्षे अशी निश्चित करण्यात आली असून, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमांनुसार सवलत मिळणार आहे. संबंधित सर्कलच्या स्थानिक भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य राहणार आहे.

निवड प्रक्रिया चार टप्प्यांत पार पडणार (great opportunity) आहे. मार्च २०२६ मध्ये ऑनलाइन लेखी परीक्षा घेतली जाईल, ज्यामध्ये वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक असे दोन्ही प्रकारचे प्रश्न असतील. त्यानंतर पात्र उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी, मुलाखत आणि स्थानिक भाषा चाचणी घेतली जाईल.
इच्छुक उमेदवारांनी २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी अर्ज शुल्क ७५० रुपये आहे, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रात स्थिर आणि प्रतिष्ठित करिअर शोधणाऱ्या तरुणांसाठी ही एक महत्त्वाची संधी मानली जात आहे.

हेही वाचा :

 महेंद्रसिंह धोनीवर मोठा अन्याय, सत्य समजताच येईल संताप, खळबळजनक माहिती समोर!

मोठी बातमी! बीजेपीचा बांगलादेशमध्ये झेंडा, लोकसभेची एक जागा जिंकली

आमच्या वयात अतंर जास्त असल्यामुळेच…, घटस्फोटावर प्रियांका चोप्रा स्पष्टच बोलली; ते सीक्रेट देखील सांगितलं