रेल्वेत नोकरी करण्याचे लाखो तरुणांचे स्वप्न असते. तुम्हालाही नोकरी करायची असेल (recruitment)तर ही बातमी खास तुमच्यासाठी. रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचे आहेत.रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये सध्या अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कोणत्याही परीक्षेशिवाय होणार आहे. त्यामुळे ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी तुम्ही rcf.indianrailways.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

रेल्वे कोच फॅक्टरी ही रेल्वे मंत्रालयाची कंपनी आहे. या कंपनीत फिटर, (recruitment)वेल्डर, पेंटर, मेकॅनिस्ट, इलेक्ट्रिशियन, कारपेंटर अशा विविध पदांसाठी अप्रेंटिस भरती सुरु आहे. तुम्हाला विविध ट्रेड्समध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जानेवारी २०२५ आहे. या नोकरीसाठी १५ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग, कागदपत्र पडताळणी आणि मेडिकल टेस्टद्वारे होणार आहे.रेल्वेतील या अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा २४ असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

अर्ज कसा करावा?
सर्वात आधी तुम्हाला www.rcf.indianrailways.gov.in वेबसाइटवर जायचे आह.
यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे. (recruitment)त्यानंतर आयडी पासवर्ड तयार करा.
यानंतर वेबसाइटवर पुन्हा एकदा लॉग इन करायचे आहे.यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती भरायची आहे. याचसोबत १०वीचे मार्कशीट आयटीआय सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे.यानंतर फोटो आणि सही अपलोड करुन अर्ज सबमिट करायचा आहे. अर्जाची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

हेही वाचा :

इचलकरंजी :महाविकास आघाडीला धक्का: सतेज पाटलांच्या पदाधिकाऱ्याचा राहुल आवाडेंसोबत हातमिळवणी

इचलकरंजी : निवडणुका बदलल्या, चेहरे बदलले; पण समस्या तशाच — आश्वासनांच्या जाळ्यात अडकलेली वस्त्रनगरी

बाबा वेंगा : नाही टळणार ही भविष्यवाणी; आता सर्व बदलणार, एक दिवस सर्व जग हिंदू धर्म स्वीकारणार