उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र (flag) शोकसागरात बुडाला आहे. बारामतीजवळ झालेल्या विमान दुर्घटनेत त्यांच्या अकाली जाण्याने राजकीय, सामाजिक आणि सामान्य जनतेमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. आज सकाळी बारामती येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत असून, हजारो नागरिक अंतिम दर्शनासाठी उपस्थित आहेत.अजित पवार यांच्या पार्थिवावर राष्ट्रध्वज अर्पण करण्यात आला असून, तो त्यांच्या मुलगा जय पवार यांच्याकडे सन्मानाने सुपूर्द करण्यात आला. हा क्षण उपस्थित प्रत्येकासाठी अत्यंत भावनिक ठरला. कुटुंबीय, सहकारी नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांनी अश्रूंनी निरोप देत त्यांच्या कार्याला श्रद्धांजली वाहिली.

आज सकाळी 11 वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर (flag) अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्याआधी सकाळी काटेवाडी येथून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. हजारो नागरिक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून ‘अजितदादा अमर रहे’च्या घोषणा देत आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देत होते.राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी यांच्यासह अनेक केंद्रीय आणि राज्यस्तरीय नेते या अंत्यसंस्कार विधीसाठी उपस्थित राहिले आहेत. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, संपूर्ण परिसरात शांतता आणि शिस्तीचे वातावरण आहे. शासकीय ध्वजारोहण, राष्ट्रगीत आणि सलामीसह अजित पवार यांना सन्मानाने अखेरचा निरोप दिला जात आहे.

अजित पवार यांच्या पार्थिवावरील राष्ट्रध्वज त्यांच्या मुलगा जय पवार (flag) यांच्याकडे सुपूर्द करताना उपस्थितांचे डोळे पाणावले. हा क्षण केवळ पवार कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी भावनिक ठरला. वडिलांच्या पार्थिवाजवळ उभा असलेला जय पवार शांतपणे श्रद्धांजली अर्पण करताना दिसून आला.कुटुंबीय, नातेवाईक आणि निकटवर्तीय सहकाऱ्यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. ग्रामीण विकास, सहकार, पाणी व्यवस्थापन आणि सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानामुळे अजित पवार यांचे नाव महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कायमस्वरूपी कोरले गेले आहे. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

वेळ पाळणाऱ्या दादांची अकाली एक्झिट! ६६ वर्षे, ६ महिने, ६ दिवस…; वयाचा विचित्र योगायोग

नि:शब्द! अजित पवारांच्या निधनानंतर पत्नी सुनेत्रा पवार यांच्यापुढे डोंगराएवढं दु:ख

मोठी बातमी! आणखी एका विमानाचा भिषण अपघात टळला, माजी उपमुख्यमंत्री थोडक्यात बचावले