2026 पासून देशभरात अनेक बदल होणार आहेत.(education)भारतातील शालेय शिक्षणात काही सकारात्मक बदल होणार आहेत. हे बदल राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार हे बदल दिसणार आहे.यामुळे विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी, अपयशी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आणि आधुनिक विषयांची ओळख करून देण्यासाठी मदत होणार आहे. हे बदल मुख्यतः बोर्ड परीक्षा, मुक्त शिक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घ्या.आता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा एकाच वर्षात दोनदा घेतल्या जाणार आहेत. पहिली परीक्षा फेब्रुवारीमध्ये आणि दुसरी एप्रिल-मेमध्ये होईल. विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षा देण्याची संधी मिळेल आणि त्यापैकी चांगल्या गुणांची निवड करता येईल.यामुळे एकाच परीक्षेच्या दबावामुळे होणारी चिंता कमी होईल आणि विद्यार्थ्यांना आपली कामगिरी सुधारण्याची दुसरी संधी मिळणार आहे. सीबीएसईने यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ज्यामुळे परीक्षा अधिक फ्लेक्सिबल आणि विद्यार्थीहिताची होईल.

बोर्ड परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती आता थेट (education)राष्ट्रीय मुक्त शालेय शिक्षण संस्थेला एनआयओएस दिली जाईल. यामुळे असे विद्यार्थी लगेच मुक्त शिक्षण प्रणालीत प्रवेश घेऊन आपले शिक्षण सुरू ठेवू शकतील. काही शाळांमध्ये एनआयओएसची छोटी शाखा उघडण्याचा विचार आहे. ज्यामुळे मुक्त शिक्षण अधिक मजबूत आणि सहज उपलब्ध होणार आहे. परीक्षेत अपयश आल्यामुळे शिक्षण सोडून देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. शिक्षण विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे.एप्रिल 2026 पासून नव्या शैक्षणिक सत्रात तिसऱ्या इयत्तेपासून विद्यार्थ्यांना एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ओळख करून दिली जाईल. सध्या सीबीएसई शाळांमध्ये हा विषय आठवीपासून शिकवला जातो पण आता तो अधिक लवकर सुरू होणार आहे. यामुळे मुले लहानपणापासूनच तंत्रज्ञानाची समज विकसित करू शकतील आणि भविष्यातील नोकऱ्यांसाठी तयार होणार आहेत.

एआयच्या चांगल्या शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या आधारावर नवीन(education)पुस्तके तयार केली जाणार आहेत. अकरावी आणि बारावीसाठी एआयचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी आयआयटीचे प्राध्यापक आणि मोठ्या कंपन्यांतील तज्ज्ञांची टीम काम करत आहे. हे पुस्तके आणि अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना एआयच्या मूलभूत गोष्टी, त्याचे उपयोग आणि नैतिक बाबी शिकवतील, ज्यामुळे शिक्षण अधिक आधुनिक आणि व्यावहारिक होईल.शिक्षण मंत्रालय अपाआर आयडीच्या मदतीने विद्यार्थ्यांचा मागोवा घेईल.बोर्ड परीक्षेत नापास झालेल्या किंवा शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांना ओळखून त्यांना एनआयओएस किंवा इतर पर्याय सुचवले जातील. यामुळे दरवर्षी लाखो विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहण्यापासून वाचतील.हे सर्व बदल विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी, शिक्षण सोडण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि आधुनिक कौशल्ये शिकवण्यासाठी आहेत. पूर्वी परीक्षा फक्त गुणांवर आधारित होत्या पण आता समज, कौशल्य आणि व्यावहारिक ज्ञानावर भर दिला जाईल. यामुळे भारतीय शिक्षण व्यवस्था अधिक समावेशक आणि भविष्याभिमुख होण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा :
प्रियांका गांधींची भावी सून अविवा बेग किती कोटींची होणार मालकीण ?
रात्री उशिरा जेवण करणं आताच थांबवा, अन्यथा पोटाच्या ५ आजारांचा धोका,
महिला पोलिसाच्या १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, सावत्र बापाचं भयंकर कृत्य