बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपले ठसा उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकुर (actress) सध्या वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वी अशी चर्चा रंगली होती की, मृणाल आणि सुपरस्टार धनुष डेट करत आहेत. आता पुन्हा एकदा ही चर्चा जोर धरत आहे आणि काही दिवसांत या जोडप्याचे लग्न होईल अशी अफवा समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ही जोडी यावर्षी व्हॅलेंटाइन डेला लग्नगाठ बांधणार असल्याचे बोलले जात आहे.गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात धनुष आणि मृणाल यांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली होती. मृणालच्या ‘सन ऑफ सरदार २’ या चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात हे दोघे एकत्र दिसले आणि गप्पा मारताना स्पॉट झाले. या व्हिडिओनंतर लगेचच अफेअरची चर्चा रंगली, आणि अनेकांनी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल अनुमान व्यक्त केले. मात्र, मृणालने या अफवांना फेटाळून सांगितले की धनुष तिचा केवळ मित्र आहे आणि कार्यक्रमात त्याला अजय देवगणने आमंत्रित केले होते. या स्पष्टीकरणानंतर अफेअरच्या चर्चा काही काळ थंडावल्या.

मीडिया रिपोर्टनुसार, १४ फेब्रुवारी २०२६ रोजी धनुष-मृणालचे लग्न होणार (actress) असल्याची चर्चा रंगली आहे. सूत्रांनी सांगितले की या सोहळ्यासाठी फक्त कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. सोशल मीडियावर या चर्चेने वेग धरला असून, चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, धनुष, मृणाल किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. डेक्कन हेराल्डच्या एका रिपोर्टनुसार, धनुषच्या जवळच्या सूत्राने अफवा खोट्या ठरवल्या असून लोकांना सोशल मीडियावर पसरवलेल्या कोणत्याही गोष्टींवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

धनुषच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाल्यास, त्याचे (actress) आधीचे लग्न रजनीकांतच्या मुलगी ऐश्वर्या रजनीकांतसोबत झाले होते. तर मृणालचे नाव पूर्वी अनेक सेलिब्रिटींसोबत जोडले गेलेले आहे. अलिकडेच ती क्रिकेटपटू श्रेयस अय्यरला डेट करत असल्याची चर्चा रंगली होती, ज्यावर मृणालने हसण्यावारी नकार दिला आणि हे वृत्त ‘मोफत पीआर’ असल्याचे म्हटले.धनुषचा ‘तेरे इश्क मैं’ हा चित्रपट नोव्हेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झाला. या कार्यक्रमात मृणाल उपस्थित होती, ज्यामुळे त्यांच्या जवळीकाबद्दल चर्चा रंगली. मीडिया रिपोर्टनुसार, मृणाल धनुषच्या बहिणी डॉ. कार्तिका कार्तिक आणि विमला गीता यांनाही इन्स्टाग्रामवर फॉलो करते, ज्यामुळे त्यांच्या घनिष्ठ नात्यावरही चर्चेला उधाण आले.ऑगस्ट २०२५ नंतर मृणाल आणि धनुष यांचे अफेअर थोड्यावेळा शांत झाले, पण सोशल मीडियावर पुन्हा चर्चेला वेग मिळाला आहे. चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली असून, सोशल मीडियावर #MrunalDhanushWedding हॅशटॅग देखील चर्चेत आला आहे.

हेही वाचा :

इचलकरंजीत संजय तेलनाडेंसह कुटुंबातील दोन सदस्यांचाही विजय; राहुल आवाडेंच्या कट्टर समर्थकाचा पराभव

कोल्हापूरच्या प्रभाग क्रमांक४ मध्ये दोन गटात तुफान हाणामरी

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर