‘पोंगल’च्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘द राजा साहब’ला या वर्षातील सर्वांत (flops)मोठा चित्रपट मानलं जात होतं. ‘बाहुबली’ स्टार प्रभासच्या करिअरमधील हा पहिलाच हॉरर चित्रपट होता. त्यामुळे चाहतेसुद्धा त्याला नव्या अंदाजात पाहण्यासाठी उत्सुक होते. परंतु चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांची निराशा झाली. काहींनी चित्रपटात सतत बॉडी-डबल वापरण्यावरही प्रश्न उपस्थित केले, तेसुद्धा अशा सीन्समध्ये जिथे याची काहीच गरज नव्हती. ‘द राजा साहब’ची कथा कमकुवत असल्याची तक्रार प्रेक्षकांनी केली आहे. परंतु या चित्रपटाच्या दिग्दर्शकांचं मात्र वेगळंच मत आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाची खोली समजली नाही, असं त्यांनी थेट म्हटलंय. थोडक्यात काय तर, प्रभासच्या या बिग बजेट चित्रपटाच्या फ्लॉप होण्याचं खापर त्यांनी प्रेक्षकांवरच फोडलं आहे.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एका पत्रकार परिषदेत (flops) ‘फ्लॉप’ शब्दावर बोलण्याबाबत दिग्दर्शक मारुती यांनी एक पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी लिहिलं की, प्रेक्षकांनी या चित्रपटाला सणासुदीच्या माहोलमध्ये पाहिलं आहे. म्हणूनच ते या चित्रपटाच्या कथेशी फार जोडले गेले नाहीत. “प्रेक्षक कोणत्याही चित्रपटाला जवळपास तीन तासांपर्यंत पाहू शकतो. परंतु त्यामागे जवळपास तीन वर्षांची मेहनत, ताण, शिकवण आणि रचनात्मक संघर्ष असतो. जर इतक्या मेहनतीची सहजपणे खिल्ली उडवली जात असेल तर वाईट वाटणारच”, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
ऑनलाइन ट्रोलिंगवर प्रतिक्रिया देताना ते पुढे म्हणाले, “एक वेळ अशी येते, (flops)जेव्हा इतरांची थट्टा करणाऱ्या लोकांना स्वत:च्या आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना हेदेखील समजत नाही की हे त्यांच्या भूतकाळातील कृतींचे परिणाम आहेत. हा शाप किंवा धमकी नाही. ही फक्त जीवन जगण्याची पद्धत आहे. प्रेक्षकांनी सणासुदीच्या वातावरणात हलक्याफुलक्या मनोरंजनाची अपेक्षा करत ‘द राजा साहब’ हा चित्रपट पाहिला. कदाचित म्हणूनच ते कथेच्या खोलीशी जोडले जाऊ शकले नाहीत. वेळेनुसार गोष्टी स्पष्ट होतात आणि खऱ्या मेहनतीला नेहमीच त्याचं स्थान मिळत, उशिरा का होईना.”
मारूती यांनी जरी त्यांची नाराजी बोलून दाखवली असली तरी त्यावरून सोशल मीडियावर मात्र कडक शब्दांत टीका होत आहे. ‘एकतर तुम्ही जास्तीत जास्त महसूल मिळवण्यासाठी सणासुदीच्या काळात चित्रपट प्रदर्शित करता. जेव्हा तो चांगली कमाई करत नाही, तेव्हा तुम्ही प्रेक्षकच उत्सवाच्या मूडमध्ये असल्याच दोष देता. हा तर्कच आश्चर्यकारक आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘समस्या माझी नाही, तर इतर सर्वांची आहे- ही मानसिकताच चुकीची आहे. इतकं मोठं बजेट आणि प्रभास हिरो असूनही इतका वाईट चित्रपट बनवला’, अशी टीका दुसऱ्या युजरने केली.
हेही वाचा :
देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेशEdit