जगातील सर्वात मोठ्या ई कॉमर्स कंपनीत नोकरकपात केली जाणार आहे.(layoff) अॅमेझॉन हजारो कर्मचाऱ्यांना कपात करण्याच्या तयारीत आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, अॅमेझॉन पुढच्या आठवड्यापासून ही नोकरकपात करणार आहे. ही २०२६ मधील पहिली नोकरकपात असणार आहे. दरम्यान, कंपनी अंदाजे ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्याच्या तयारीत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कपातीमुळे कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे. सध्या कंपनीत ३,५०,००० कर्मचारी काम करत आहेत. त्यातील ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्यात येणार आहे. यातील पहिल्या टप्प्यातील कपात पुढच्या आठवड्यात होणार आहे.

पुढच्या आठवड्यात १४,००० कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आबे.(layoff) यावेळी कंपनीने संकेत दिले आहेत की, २०२६ पर्यंत आणखी कपात होऊ शकते. अॅमेझॉनने याबाबत माहिती दिली आहे. संस्थेतील कर्मचाऱ्यांना अधिक चपळ बनवण्यासाठी आणि अनावश्यक मॅनेजमेंट कमी करण्यासाठी तसेच खर्चदेखील कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. कंपनी आता एआय आणि क्लाउड टेक्नोलॉजीमध्ये गुंतवणूक करत आहे.

एआय आणि डेटासंबंधित पदांसाठी भरती होत असल्याने इतर (layoff)भूमिकांमधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कमी केल्या जात आहेत.रिपोर्टनुसार, अॅमेझॉनमध्ये १.५७ दशलक्ष कर्मचारी होते. कंपनीने याआधीही अनेक कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले होते. कंपनीने २०२२ आणि २०२३ मध्ये कर्मचाऱ्यांची कपात केली होती. २७,००० कर्मचाऱ्यांची कपात केली होती. एआयमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक केल्याने कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कमी केल्या जात आहेत.

हेही वाचा :

महापालिकेत खुल्या वर्गाला आरक्षण, महापौरपदी कोण विराजमान होणार?

राजकीय भूकंप! भाजप आणि एमआयएमची हातमिळवणी; राज्यातील समीकरणे बदलणार?

२४ लाख लाडक्या बहि‍णींचा लाभ बंद