कायदा विषयाची पदवी घेतलेल्या किंवा सध्या एलएलबीचे शिक्षण घेत (opportunity)असलेल्या तरुणांसाठी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये काम करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सुप्रीम कोर्टाने Law Clerk-cum-Research Associate Recruitment 2026 अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू केली असून, या माध्यमातून एकूण 90 लॉ क्लर्क पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. सुप्रीम कोर्टात काम करताना कायदेशीर संशोधन आणि न्यायिक प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.भारताला विश्वगुरु करण्याचे आमचे स्वप्न! सातफळे यांचे प्रतिपादन; वैद्यकीय महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शनसुप्रीम कोर्ट लॉ क्लर्क भरती 2026 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 20 जानेवारी 2026 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीखही 7 फेब्रुवारी 2026 हीच आहे. या भरतीसाठी लेखी परीक्षा 7 मार्च 2026 रोजी घेतली जाणार आहे.

या भरतीसाठी ते उमेदवार पात्र आहेत, ज्यांनी एलएलबी पदवी पूर्ण केली आहे (opportunity) किंवा सध्या एलएलबीचे शिक्षण घेत आहेत. सुप्रीम कोर्टात लॉ क्लर्क म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यास उमेदवारांना देशातील सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीचा तसेच उच्च दर्जाच्या कायदेशीर संशोधनाचा मौल्यवान अनुभव मिळतो.पूर्ण होणार आहे.पहिल्या टप्प्यात लेखी परीक्षा घेतली जाईल, ज्यामध्ये कायद्याशी संबंधित प्रश्न विचारले जातील. या परीक्षेत MCQ आणि सब्जेक्टिव्ह अशा दोन्ही प्रकारच्या प्रश्नांचा समावेश असेल.लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यात मुलाखतीसाठी बोलावले जाईल.लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट तयार केली जाईल. लॉ क्लर्क पदासाठी उमेदवारांचे किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 32 वर्षे असावे.
आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल (opportunity). निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा सुमारे 1 लाख रुपये मानधन दिले जाणार असून, त्यामुळे ही भरती लॉ विद्यार्थ्यांमध्ये आणि पदवीधरांमध्ये विशेष आकर्षणाचा विषय ठरली आहे.सुप्रीम कोर्टात काम करण्याची आणि कायदेशीर संशोधन क्षेत्रात करिअर घडवण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती एक सुवर्णसंधी आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी Supreme Court Law Clerk Recruitment 2026 Notification काळजीपूर्वक वाचावी आणि अंतिम तारखेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. या भरतीसंदर्भातील सर्व अधिकृत अपडेटसाठी उमेदवारांनी सुप्रीम कोर्टाची अधिकृत वेबसाइट sci.gov.in नियमितपणे तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे
हेही वाचा :
देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश