दहावीच्या बोर्ड परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे.(tickets) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने SSC Exam 2026 साठी हॉल तिकीटाबाबत स्पष्ट सूचना जारी केल्या असून, ही हॉल तिकीटे 20 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. परीक्षा जवळ येत असताना विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.राज्यातील सर्व विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रातील माध्यमिक शाळांना ही हॉल तिकीटे मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळाचा वापर करावा लागणार आहे.

हॉल तिकीट डाऊनलोड करणे, त्याची प्रिंट काढणे आणि विद्यार्थ्यांना(tickets) देणे ही जबाबदारी संबंधित शाळांची असेल. विद्यार्थ्यांना स्वतः कोणतीही प्रक्रिया करावी लागणार नाही. छापील हॉल तिकीटावर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी आणि शाळेचा शिक्का असणे अनिवार्य करण्यात आले आहे.तसेच, हॉल तिकीट देताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारू नये, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे. तांत्रिक अडचणी आल्यास शाळांनी थेट आपल्या विभागीय मंडळाशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे शुल्क भरले आहे, त्यांनाच हॉल तिकीट दिले जाणार आहे. (tickets) ज्यांचे शुल्क अद्याप भरलेले नाही, त्यांनी शुल्क भरल्यानंतरच त्यांचे प्रवेशपत्र जारी करण्यात येईल. यंदा दहावीची लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार असून, प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा 2 फेब्रुवारी 2026 ते 18 फेब्रुवारी 2026 दरम्यान पार पडणार आहेत.

हेही वाचा :

देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे

कोल्हापुरात महायुतीचा जोरदार प्रचार प्रारंभ; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रेचा उत्साह

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश