महाराष्ट्र हे भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्राचे ‘गेटवे-ऑफ-इंडिया’ (jobs)असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान दावोस येथे खरे ठरत असल्याचे चित्र आहे. जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रासाठी तब्बल १४ लाख ५० हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक करार करण्यात आले असून, या गुंतवणुकीमधून राज्यात सुमारे १५ लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत. राज्य शासनाच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील देशी-विदेशी उद्योग प्रतिनिधींशी हे सामंजस्य करार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.दावोस मधील पहिल्याच दिवसापासून जगभरातील विविध क्षेत्रातील उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुकता दाखवली. त्यामुळे महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. हरित ऊर्जा, अन्न प्रक्रिया, पोलाद उद्योग, आयटी-आयटीईएस, डेटा सेंटर्स, ईव्ही-ऑटोमोबाईल, जहाज बांधणी आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर अशा अनेक क्षेत्रांतील गुंतवणूक मुंबईसह रत्नागिरी, पालघर, गडचिरोली आणि अहिल्यानगरसारख्या भागांमध्ये येणार आहे. यामुळे औद्योगिक विकासासोबतच मोठ्या प्रमाणावर स्थानिक रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.

दावोस येथील महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते(jobs)आणि उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र हे विश्वासार्ह आणि दीर्घकालीन भागीदारीसाठी सज्ज असलेले राज्य असल्याचे सांगत, भारताच्या भविष्याचे पॉवर हाऊस म्हणून महाराष्ट्र उद्योगविश्वाला साद घालत असल्याची भावना व्यक्त केली. महाराष्ट्रावर उद्योग क्षेत्राचा आणि गुंतवणूकदारांचा जो विश्वास आहे, तो सार्थ ठरवण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, करण्यात आलेल्या सामंजस्य करारांची अंमलबजावणी वेळेत व्हावी यासाठी ‘वॉर रूम’च्या माध्यमातून सतत देखरेख केली जाईल. उद्योजकांना आवश्यक सुविधा दर्जेदार आणि वेळेत मिळाव्यात, यासाठी शासन विशेष काळजी घेणार आहे. यंदा मिळणारा प्रतिसाद पाहता, मागील वर्षाच्या तुलनेत अधिक गुंतवणूक आणि रोजगार संधी निर्माण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन, हवा आणि पाणी गुणवत्ता नियंत्रणाच्या (jobs) माध्यमातून सर्क्युलर इकॉनॉमी उभारण्यावर शासनाचा भर असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एमएमआर क्षेत्राचा विकास आणि तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार समितीने दिलेल्या आराखड्यानुसार पुढील पावले टाकली जात असून, यातून व्यवसाय आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.दरम्यान, पुढील दोन दिवसांत दावोस येथे एआय, क्वांटम कम्प्युटिंग, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, फिनटेक, लॉजिस्टिक्स, इन्फ्रास्ट्रक्चर, जहाज बांधणी, ईव्ही आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील आणखी काही उद्योग समूहांशी गुंतवणूक करार होण्याची शक्यता आहे. त्यासाठी संबंधित प्रतिनिधींशी चर्चा सुरू आहे. गतवर्षी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा कक्ष मुळे उद्योग सुलभतेला चालना मिळाली असून, यंदा गुंतवणूकदारांचा महाराष्ट्राकडे ओघ अधिक वाढल्याचे स्पष्ट होत आहे.
ही वाचा :
चपातीऐवजी भाकरी खाणं खरंच योग्य आहे का? जाणून घ्या सल्ला अन् शरीरावर होणारे परिणाम
SBI च्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! नवीन नियम लागू?
फक्त 180 रुपयांची दारू, पण तुफान गाजली! फक्त हिवाळ्यात विकल्या गेल्या 17,90000 बॉटल्स