आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक जण मधुमेह, (chapati) लठ्ठपणा आणि हृदयरोगासारख्या समस्यांना सामोरे जावं लागतं. चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव हे यामागचं मुख्य कारण आहे. पण आहारात छोटा बदल केल्याने आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. बाजरी ही एक पारंपरिक आणि पौष्टिक धान्य आहे. गव्हाच्या चपात्यांऐवजी बाजरीची भाकरी पचायला हलकी असते. त्यात फायबर, प्रथिने आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात.

पचनसंस्था सुधारते
बाजरीत भरपूर फायबर असल्यामुळे पचन चांगलं होतं. बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या तक्रारी कमी होतात. पोट हलकं आणि स्वच्छ राहण्यास मदत होते.
वजन कमी होण्यास मदत
बाजरीची भाकरी खाल्ल्याने लवकर पोट भरल्यासारखं वाटतं.(chapati) त्यामुळे वारंवार खाण्याची सवय कमी होते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी बाजरी फायदेशीर आहे.
हार्टसाठी फायदेशीर
बाजरीतील मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. हृदयाचं आरोग्य सुधारण्यास बाजरी मदत करते.
हाडं आणि ऊर्जा वाढते
बाजरीत कॅल्शियम आणि फॉस्फरस असतो. त्यामुळे हाडं मजबूत होतात. शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते.
त्वचा आणि केसांना होणारे फायदे
बाजरीत अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे त्वचा निरोगी आणि (chapati)तजेलदार दिसते. केस गळणं कमी होऊन चमक वाढते. बाजरी नेहमी पूर्ण शिजवूनच खा. तसेच भाकरी संतुलित आहाराचा भाग असते म्हणून रोज घाणं फायदेशीर ठरु शकतं. कोणतीही आरोग्याची समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हेही वाचा :
इचलकरंजीत संजय तेलनाडेंसह कुटुंबातील दोन सदस्यांचाही विजय; राहुल आवाडेंच्या कट्टर समर्थकाचा पराभव
कोल्हापूरच्या प्रभाग क्रमांक४ मध्ये दोन गटात तुफान हाणामरी
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर