आपण रोजच्या धावपळीत थकवा, चक्कर येणे किंवा सतत चिडचिड होणे याकडे दुर्लक्ष करतो.(deficiency) पण ही लक्षणं फक्त ताणतणावाची नसून Vitamin B च्या कमतरतेमुळेही असू शकतात. Vitamin B शरीरातील ऊर्जा, मेंदू आणि नर्व्हस सिस्टिमसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्याची कमतरता वेळेत ओळखणं गरजेचं आहे. पुढे आपण याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

- सतत थकवा आणि कमजोरी जाणवणे.
पुरेशी झोप घेऊनही थकवा जाणवत असेल तर सावध व्हा. कारण Vitamin Bच्या कमीची ही लक्षणे असू शकतात. Vitamin B12 ऊर्जा निर्माण प्रक्रियेत मदत करते. त्याची कमतरता असेल शरीर लवकर थकतं आणि कमजोरी वाढते. - त्वचा फिकट किंवा पिवळसर दिसणं.
अचानक चेहऱ्यावरचे तेज कमी होणे आणि त्वचा फिकट दिसणे.(deficiency) हे लक्षण व्हिटॅमिन्सची कमीचे असू शकते. Vitamin B12 कमी झाल्याने रक्तातल्या लाल पेशी कमी होतात. यामुळे अॅनिमिया होऊन श्वास घेताना त्रास होऊ शकतो. - हात-पाय सुन्न होणे.
हात-पायांमध्ये मुंग्या किंवा सुन्नपणा जाणवत असेल तर शरीरात व्हिटॅमिन्सची कमी आहे. Vitamin B12 नर्व्हसाठी महत्वाचं असतं. कमतरतेमुळे नर्व्ह डॅमेज होऊन ही लक्षणं दिसतात. - चिडचिड किंवा नैराश्य.
कारण नसताना चिडचिड किंवा उदास वाटत असेल तर व्हिटॅमिनच्या कमीचा (deficiency)हा परिणाम समजावा. Vitamin B6, B12 आणि फोलेट मेंदूतील रसायनांसाठी आवश्यक असतो. याच्या कमतरतेमुळे नैराश्य आणि मानसिक अस्वस्थता वाढते.
ही वाचा :
चपातीऐवजी भाकरी खाणं खरंच योग्य आहे का? जाणून घ्या सल्ला अन् शरीरावर होणारे परिणाम
SBI च्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! नवीन नियम लागू?
फक्त 180 रुपयांची दारू, पण तुफान गाजली! फक्त हिवाळ्यात विकल्या गेल्या 17,90000 बॉटल्स