देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया(customers)ने ग्राहक व्यवहार शुल्कात बदल जाहीर केला आहे. विशेषत द्वारे होणाऱ्या ऑनलाइन व्यवहारांवर आता सेवा शुल्क आकारले जाणार असल्याने अनेक खातेदारांच्या दैनंदिन डिजिटल व्यवहारांवर याचा परिणाम होऊ शकतो. आतापर्यंत IMPS व्यवहार पूर्णतः मोफत होते. मात्र नव्या नियमानुसार, ठराविक रकमेपेक्षा जास्त व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार आहे. मात्र, लहान डिजिटल व्यवहारांवर कोणताही अतिरिक्त भार येणार नाही, अशी माहिती SBI कडून देण्यात आली आहे.

नवीन नियमांनुसार, IMPS द्वारे 25,000 रुपयांपर्यंतचा व्यवहार मोफत राहणार आहे. (customers)मात्र, त्यापेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांसाठी ग्राहकांना सेवा शुल्क भरावे लागेल. 25,000 ते 1 लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारावर 2 रुपये + GST, 1 लाख ते 2 लाख रुपयांपर्यंत 6 रुपये + GST, तर 2 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारावर 10 रुपये + GST शुल्क आकारले जाईल.ही शुल्करचना 15 फेब्रुवारी 2026 पासून लागू होणार आहे. इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग किंवा YONO अॅपद्वारे 25,000 रुपयांपर्यंतचे व्यवहार मात्र पूर्वीप्रमाणेच मोफत राहतील. त्यामुळे रोजच्या छोट्या व्यवहारांवर ग्राहकांना कोणताही अतिरिक्त खर्च येणार नाही.

SBI ने शाखेतील IMPS व्यवहारांच्या शुल्कात कोणताही बदल केलेला नाही.(customers) तसेच DSP, PMSP, ICSP, CGSP, PSP, RSP खाती, शौर्य कुटुंब पेन्शन खाते आणि SBI रिश्ते कुटुंब बचत खातेधारकांना या सुधारित शुल्कातून सूट दिली जाणार आहे.याशिवाय, ATM आणि ADWM व्यवहारांवरील शुल्कातही वाढ करण्यात आली असून, इतर बँकांच्या ATM मधून मोफत मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढल्यास 23 रुपये + GST आकारले जाणार आहेत. मात्र, बेसिक सेव्हिंग्स बँक खाते, SBI डेबिट कार्ड धारक आणि किसान क्रेडिट कार्ड खातेधारकांना या वाढीव शुल्कातून वगळण्यात आले आहे.

हेही वाचा :

इचलकरंजीत संजय तेलनाडेंसह कुटुंबातील दोन सदस्यांचाही विजय; राहुल आवाडेंच्या कट्टर समर्थकाचा पराभव

कोल्हापूरच्या प्रभाग क्रमांक४ मध्ये दोन गटात तुफान हाणामरी

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकव