देशातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. (paid) आता देशात टोल प्लाझावर टोल देण्याच्या पद्धतीत पूर्णपणे बदल केला जाणार आहे. केंद्र सरकार कॅशलेस टोल करण्याच्या तयारीत आहे. येत्या १ एप्रिलवरुन नॅशनल टोल प्लाझावर कोणत्याही प्रकारचे कॅश पेमेंट न घेण्याच्या तायरीत आहे. याचाच अर्थ असा की, आता तुम्हाला यूपीआय किंवा फास्टॅगद्वारेच टोल भरावा लागणार आहे. यामुळे तुमचा खूप वेळ वाचणार आहे.टोल प्लाझावर यूपीआयद्वारे किंवा फास्टॅगद्वारे काही सेकंदात पेमेंट करु शकतात. जर तुम्ही कॅशने पेमेंट करत असाल तर तुम्हाला बराच वेळ टोल प्लाझावर उभे राहावे लागते. ही समस्या आता कायमची बंद होणार आहे.

नवीन सुविधेअंतर्गत आता वाहनचालकांना फास्टॅग किंवा यूपीआयद्वारे पेमेंट करता येणार आहे. (paid) डिजिटल ट्रॅव्हलच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे. सरकारच्या म्हणण्यांनुसार, या निर्णयानुसार फक्त पैसे नाही तर वेळेचीही बचत होणार आहे.
सरकार सर्व टोल प्लाझा कॅशलेस करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, कधीपासून हे लागू होणार याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यामागचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे टोल प्लाझावरील वाहतूक कोंडी कमी करणे. आता एका स्कॅनवर तुम्ही टोल भरु शकणार आहात.
यामुळे सुट्टे पैसे घेण्यासाठी किंवा कॅश काढण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. (paid) याचसोबत पेमेंटचे डिजिटल रेकॉर्डदेखील ठेवता येणार आहे.केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव व्ही उमाशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताची डिजिटल अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत आहे. यूपीआयवरुन टोल भरण्याची सुविधा सुरु केली तेव्हा जनतेने चांगली पसंती दिली. आता सरकारने टोल प्लाझावर रोख रक्कमेसाठी पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिलनंतर फास्टॅग किंवा यूपीआयद्वारे टोल भरता येणार आहे.
हेही वाचा :
इचलकरंजीत संजय तेलनाडेंसह कुटुंबातील दोन सदस्यांचाही विजय; राहुल आवाडेंच्या कट्टर समर्थकाचा पराभव
कोल्हापूरच्या प्रभाग क्रमांक४ मध्ये दोन गटात तुफान हाणामरी
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर