सध्या लग्नसराई आणि सणासुदीचे दिवस सुरु आहेत. सणासुदीच्या दिवसात (Price) अनेकजण सोने-चांदी खरेदी करतात. परंतु सध्या सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. सोन्याचे दर सतत वाढत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना सोने विकत घेता येत नाही. मात्र,सणासुदीला सोने नाही तर चांदीची एखादी वस्तू खरेदी करतात. मात्र, आता चांदीचेही दर खूप वाढले आहेत. आतापर्यंतचे हे सर्वाधिक दर आहेत. चांदीचे दर प्रति किलोमागे ३ लाख ४ हजार रुपये झाले आहेत.

देशभरात प्रसिद्ध असलेल्या खामगावच्या बाजारपेठेत चांदीच्या (Price) भावाने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहे. चांदीचा आजचा भाव 3 लाख 4 हजार रुपये प्रति किलो आहे. चांदीचे भाव वाढल्याने ग्राहकांची संख्या 70 टक्क्यांनी कमी झाली आहे. परिणामी चांदीच्या विक्रीत मोठी मंदी पाहायला मिळत आहे.खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत आज चांदीचा भाव उच्चांक स्तरावर पोहोचला आहे. खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत चांदीचे आजचे भाव तीन लाख चार हजार रुपये प्रति किलो झाले आहे.

अमेरिकेने लादलेले निर्बंध,टॅरिफ… इराण आणि वेनिंजुएला मध्ये असलेली (Price) अस्थिरता, व्याजदरात झालेली कमतरता यामुळे चांदी आणि सोन्याचे भाव वाढत आहे. व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की, आगामी काळात सोने-चांदीचे भाव वाढत राहतील .मात्र वाढत्या चांदीच्या भावामुळे चांदीचे 70 टक्के ग्राहक कमी झाल्यामुळे चांदीच्या बाजारपेठेत मोठी मंदी बघायला मिळत आहे.

हेही वाचा :

इचलकरंजीत संजय तेलनाडेंसह कुटुंबातील दोन सदस्यांचाही विजय; राहुल आवाडेंच्या कट्टर समर्थकाचा पराभव

कोल्हापूरच्या प्रभाग क्रमांक४ मध्ये दोन गटात तुफान हाणामरी

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर