बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना कमी वयातच जीवघेण्या (medications)आजारांना सामोरं जावं लागतं. कारण सध्या लाइफस्टाइल बदलली आहे. पण त्यामध्ये चांगल्या सवयी नाहीत. माणूस हा सध्या सगळ्यात आळशी प्राणी झालाय. कारण लोक बेसिक सवयींना फॉलो करायला कंटाळतात आणि कमी वयातच गंभीर आजारांना सामोरं जातात. त्यामुळे सध्या वृद्धांप्रमाणे तरुणांचेही हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तुम्हाला त्याच्या संबंधीत कोणत्याही समस्या असतील तर त्यावर वेळीच उपचार करणं महत्वाचं आहे.हार्ट अटॅक हा येणापुर्वी रुग्णांना उच्च रक्तदाबाच्या गंभीर समस्येला सामोरं जावं लागतं. हा आजार सायलेंट किलर असल्याचं डॉक्टर म्हणतात. कारण याची लक्षणे कोणालाच ओळखता येत नाहीत. पण वेळेवर उपचार केले नाहीत तर, स्ट्रोक, हृदयविकार किंवा किडनीचं नुकसान यांसारख्या गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं.जगभरातील कोट्यवधी लोकांचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी काही औषधे महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र इतर औषधांप्रमाणेच ब्लड प्रेशरच्या औषधांचा किडनीवर दुष्परिणाम होऊ शकतो. हे दुष्परिणाम औषधांच्या प्रकारानुसार बदलतात, पण बऱ्याच वेळेस योग्य काळजी घेतल्यावर तुम्हाला या समस्येपासून लांब राहता येईल. पुढील माहितीत आपण याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

चक्कर येणे
ब्लड प्रेशरची औषधे घेतल्यानंतर काही लोकांना उभं राहिल्यावर चक्कर येते. (medications) याला ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन म्हणतात. अशा वेळी झोपेतून किंवा बसलेल्या अवस्थेतून हळूहळू उभे राहा. तसेच भरपूर पाणी पिणं हे खूप फायदेशीर ठरु शकतं. जर हा त्रास खूप होत असेल तर डॉक्टरांकडून थोड्या कमी पॉवरच्या गोळ्या घ्या.

सतत थकवा जाणवणे
काही औषधांमुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. काही आठवड्यांत शरीर औषधांना सरावतं आणि थकवा कमी होतो. हलका व्यायाम, चालणं किंवा योगा करुन तुम्ही तुमची ऊर्जा वाढवू शकता.पण थकवा खूप वाढत असेल किंवा कमी होत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

कोरडा खोकला
ACE inhibitors घेणाऱ्या रुग्णांना कोरड्या खोकल्याला सामोरं जावं लागतं. (medications)त्याने सतत खोकून घसा दुखी, झोप मोड अशा समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे स्वतःहून औषध करु नका. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळेस ACE inhibitors ऐवजी ARB सारखी औषधं दिल्याने हा त्रास कमी होऊ शकतो. तसेच गुडघ्यांमध्ये सुज सुद्धा येऊ शकते. त्यावेळेस मीठ खाणं कमी करणं हा एक उपाय फायदेशीर ठरु शकतो. त्यामुळे कोणत्याही समस्या खूप तीव्रपणे जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे.

हेही वाचा :

मराठी रीलस्टार प्रथमेश कदमचे दुःखद निधन; चाहत्यांना मोठा धक्का!

प्रत्येक गोष्टीत राजकारण कशाला?…

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ग्रामीण भागातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा झणझणीत काळ मटण, नोट करून घ्या रेसिपी