हजारो तरुण सरकारी नोकरीची तयारी करत असतात. सरकारी नोकरीसाठी (company) परीक्षेची तयार करत असतात. दरम्यान, तुम्हालाही सरकारी नोकरी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एनपीसीआयएल या सरकारी कंपनीत भरती जाहीर करण्यात आली आहे. वैज्ञानिक सहाय्यक, प्रशिक्षणार्थी, एक्स-रे तंत्रज्ञ, सहाय्यक ग्रेड १ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाअंतर्गत काम करते. ही एक सरकारी कंपनी आहे. या कंपनीत विविध पदांसाठी भरती केली जात आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ फेब्रुवारी २०२६ आहे. इच्छुकांनी www.npcilcareers.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहेत.

एनपीसीआयएल कंपनीत एकूण ११४ पदांसाठी भरती केली जाणार आहे. (company)या नोकरीसाठी १८ ते २८ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ३४,२८६ ते ५५,९३२ रुपये पगार मिळणार आहे. त्यामुळे चांगल्या सरकारी कंपनीत नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे.या भरती मोहिमेत शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. ट्रेनी पदासाठी उमेदवारांनी अभियांत्रिकी पदवी प्राप्त केलेली असावी. वैज्ञानिक सहाय्यक पदासाठी सिव्हिल इंजिनियरिंग पदवी प्राप्त केलेली असावी. सायंटिफिकट असिस्टंट पदासाठी बी.एससी पदवी प्राप्त केलेली असावी. एक्स- रे टेक्निशियन पदासाी सायन्स स्ट्रीममधून पदवी प्राप्त केलेली असावी.
अर्ज कसा करावा?
सर्वात आधी www.npcilcareers.co.in या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर सर्वात आधी रजिस्ट्रेशन करायचे आहे. (company)यासाठी तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकायचा आहे.यानंतर तुम्हाला पुन्हा लॉग करायचे आहे. यानंतर फॉर्म भरायचा आहे.फॉर्म भरताना तुम्हाला फोटो आणि सही अपलोड करायची आहे. यानंतर फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.
हेही वाचा :
महापालिकेत खुल्या वर्गाला आरक्षण, महापौरपदी कोण विराजमान होणार?
राजकीय भूकंप! भाजप आणि एमआयएमची हातमिळवणी; राज्यातील समीकरणे बदलणार?
२४ लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद