इचलकरंजीचे राजकारण प्रत्येक निवडणुकीच्या रणधुमाळीत चांगलेच तापते.(textile) सत्तांतर होते, लोकप्रतिनिधी बदलतात; मात्र शहराच्या मूलभूत समस्यांचे चित्र मात्र आजही ‘जैसे थे’च आहे. लोकसभा, विधानसभा आणि आता होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीतही उमेदवारांना याच जुन्या प्रश्नांची आठवण करून देत मतदारांच्या दारात जावे लागत आहे, हेच इचलकरंजीच्या राजकारणाचे दुर्दैवी वास्तव बनले आहे.पाणीटंचाई, वस्त्रोद्योगाशी संबंधित अडचणी, वाढीव वीजबिल, शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था, सततची वाहतूक कोंडी, पंचगंगा नदीचे प्रदूषण आणि आरोग्यविषयक प्रश्न हे इचलकरंजीकरांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत आहेत. प्रत्येक निवडणुकीत या समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याची ग्वाही दिली जाते; मात्र निवडणूक संपताच ही आश्वासने हवेत विरत असल्याचा अनुभव नागरिक वारंवार घेत आहेत.

आता महापालिका निवडणुकांचे वातावरण तापू लागले (textile) असून विविध पक्षांत इच्छुक उमेदवारांची लगबग सुरू झाली आहे. उमेदवारी निश्चित करण्यासाठी आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी पुन्हा एकदा आश्वासनांची खैरात होण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेष म्हणजे, याआधी मार्गी न लागलेल्या याच समस्यांना घेऊन उमेदवार भावनिक साद घालणार, हे जवळपास निश्चित आहे. “आम्ही आलो तर प्रश्न सोडवू” या शब्दांवरच पुन्हा एकदा मते मागितली जाणार आहेत.यामुळे उमेदवार बदलतात, पक्ष बदलतात; पण शहरासमोरील प्रश्नांची यादी मात्र तशीच राहते. उद्योगांचे प्रश्न, वाढते प्रदूषण आणि पायाभूत सुविधांचा अभाव या बाबीकडे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

याच पार्श्वभूमीवर, या वस्त्रनगरीच्या समस्या कधी मार्गी लागणार, (textile) हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे आणि त्याचा थेट परिणाम लोकप्रतिनिधींवरील विश्वासावर होत आहे.इचलकरंजीला ‘मँचेस्टर’ म्हणून उद्योगविश्वात मान मिळाला असला, तरी सध्याच्या परिस्थितीत त्या ओळखीला साजेशी प्रगती दिसून येत नाही. औद्योगिक पायाभूत सुविधांचा अभाव, प्रदूषणाचा वाढता धोका, विस्कळीत वाहतूक व्यवस्था आणि नियोजनाचा अभाव यामुळे शहराच्या विकासाचा वेग खुंटला आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मतदारांनी केवळ आश्वासनांवर न भुलता आतापर्यंत झालेल्या कामांचा जाब विचारणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे. अन्यथा, प्रत्येक निवडणुकीत इचलकरंजीच्या समस्यांची अशीच पुनरावृत्ती होत राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

इचलकरंजीतील एका खाजगी शाळेत तिसरीत शिकणाऱ्या मुलीला महिला शिक्षिकेने किरकोळ कारणावरून केली बेदम मारहाण

राजकीय भूकंप! माणिकराव कोकाटेंना रुग्णालयातूनच बेड्या ठोकणार?

४ कोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी, राज्यात खळबळ