केंद्र सरकारच्या सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या(employees)केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. रक्षाबंधनच्या आधीच महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची शक्यता आहे. जानेवारी २०२५ पासून लागू असलेल्या ५५% महागाई भत्त्यात आता ३% वाढ होऊन तो ५८% वर जाणार असल्याचे बोलले जात आहे. जुलै २०२५ पासून लागू होणाऱ्या या वाढीचा लाभ ऑगस्ट महिन्याच्या पगारात, म्हणजेच कर्मचाऱ्यांना सप्टेंबरमध्ये मिळणाऱ्या पगारासोबत मिळेल. यासोबतच जुलै महिन्याचा महागाई भत्ता फरक सुद्धा एकरकमी दिला जाणार आहे. सध्या सरकारकडून याबाबत अधिकृत आदेश प्रतीक्षेत आहे.

महागाई भत्ता ठरवताना AICPI निर्देशांक महत्त्वाची भूमिका बजावतो. जानेवारी ते जून २०२५ या कालावधीतील निर्देशांक पाहता, महागाई भत्ता वाढवण्याचे संकेत मिळत होते.(employees) जून महिन्यासाठी AICPI निर्देशांक १४५ नोंदवला गेला होता. या आकड्यांवर आधारित अंदाजानुसार महागाई भत्ता ५५% वरून थेट ५८% पर्यंत वाढवला जाणार आहे. यामुळे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना आर्थिक फायदा होणार आहे. विशेषतः रक्षाबंधन, गणेशोत्सव आणि दिवाळीसारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर ही वाढ मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.

दरवर्षी जुलै महिन्यापासूनची महागाई भत्ता वाढ दसरा-दिवाळीच्या दरम्यान जाहीर केली जाते, मात्र यंदा रक्षाबंधनाआधीच आदेश जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण जून महिन्याचे अंतिम निर्देशांक नुकतेच समोर आले आहेत.
सरकारकडून अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महागाई भत्त्याबाबतचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. (employees)त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी रक्षाबंधनपूर्वीच ही एक आनंदवार्ता ठरणार आहे.

हेही वाचा :
भारतातील असे 3 शिवमंदिर जिथे मिळते खाण्यापिण्याची आणि राहण्याची फ्री सुविधा; यंदाच्या श्रावणात एकदा नक्की भेट द्या
महादेवी हत्तीणीसाठी नांदणी ते कोल्हापूरआत्मक्लेश मूक मोर्चा
“संशया”वरून दोष सिद्धी नाही “मालेगाव स्फोट”आरोपी निर्दोष