महाराष्ट्राच्या राजकारणात शिस्त, वेळेची काटेकोरता आणि स्पष्ट वक्तृत्व यांची (premature)ओळख असलेले ‘वेळ पाळणारे दादा’ अचानक काळाच्या पडद्याआड गेले. यानंतर संपूर्ण राज्य सुन्न झाले. ज्यांनी आयुष्यभर वेळेचा आदर केला, निर्णय घेताना क्षणही वाया घालवला नाही, त्या दादांची एक्झिटही तितकीच अनपेक्षित आणि वेदनादायी ठरली. त्यांच्या जाण्याने केवळ एक नेता नाही, तर एक शिस्तप्रिय प्रशासक, एक स्पष्टवक्ता राजकारणी आणि अनेकांसाठी मार्गदर्शक हरपला आहे. त्यांच्या निधनानंतर वयाचा एक विचित्र योगायोग दिसून आला आहे.

अजित पवारांच्या आयुष्याचा शेवटचा आकडा पाहून अनेकांच्या (premature)मनात गूढ शांतता आणि अस्वस्थता दाटून आली आहे. तो आकडा आहे, ६६ वर्षे, ६ महिने आणि ६ दिवस… अजित पवारांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी झाला आहे. तर त्यांचं दुर्दैवी निधन आज म्हणजेच २८ जानेवारी २०२६ ला झालं आहे. यावरून त्यांचा जीवनकाळ ६६ वर्षे, ६ महिने आणि ६ दिवस इतका होता. या एक वयाचा अंगावर काटा आणणारा योगायोग दिसून येत आहे.हा योगायोग केवळ आकडा नसून अनेकांना अंतर्मुख करणारा ठरतो आहे. विज्ञान, श्रद्धा आणि योगायोग यांच्यात अडकलेला हा क्षण अनेकांच्या मनात न बोलता राहिलेला प्रश्न सोडून जातो. राजकारणात असो वा वैयक्तिक आयुष्यात, दादांची वेळ पाळण्याची सवय सर्वश्रुत होती. मात्र वेळ पाळणाऱ्या दादांची अकाली एक्झिट झाली. बैठका असोत, दौरे असोत किंवा निर्णयप्रक्रिया उशीर, गोंधळ किंवा निष्काळजीपणा यांना त्यांच्या शब्दकोशात स्थान नव्हते.
अधिकाऱ्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांना ते एकच सांगायचे की, वेळ पाळली, (premature)तर व्यवस्था चालते. बाहेरून कठोर, थेट आणि कधी कधी रोखठोक वाटणारे दादा प्रत्यक्षात मात्र मनाने अतिशय संवेदनशील होते. अनेक कार्यकर्त्यांच्या अडचणी त्यांनी सोडवल्या होत्या. अनेकांचे करिअर त्यांनी शब्द न बोलता घडवले. प्रसिद्धीपेक्षा कामाला महत्त्व देणारी त्यांची वृत्ती आजच्या राजकारणात दुर्मिळ होती.
राजकारणात दादा सक्रिय होते. अनेक मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळत होते. पुढील योजना आखत होते. अशा वेळी त्यांची ही अकाली एक्झिट म्हणजे राज्याच्या सार्वजनिक जीवनात निर्माण झालेली मोठी पोकळी आहे. समर्थक, सहकारी, विरोधक सर्वच त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त करत आहेत. कारण मतभेद असले, तरी त्यांच्या कामावर कुणीही शंका घेतली नाही. दादा आता आपल्यात नाहीत, पण त्यांची शिस्त, निर्णयक्षमता, स्पष्ट बोलण्याची हिंमत आणि वेळेचा आदर हे सर्व महाराष्ट्राच्या राजकीय स्मृतीत कायम राहील. वेळ पाळणाऱ्या दादांची एक्झिट झाली असली, तरी त्यांच्या कामाचा ठसा काळाच्या पटलावर अढळ राहणार आहे.
हेही वाचा :
मराठी रीलस्टार प्रथमेश कदमचे दुःखद निधन; चाहत्यांना मोठा धक्का!
प्रत्येक गोष्टीत राजकारण कशाला?…