महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या (truth) निधनाने संपूर्ण देश हादरला आहे. बुधवारी सकाळी बारामती विमानतळाजवळ व्हीएसआर व्हेंचर्स विमान नोंदणी क्रमांक व्हीटी-एसएसके कोसळले. मोठा स्फोट झाला आणि विमान आगीच्या ज्वाळांनी वेढलं गेलं. या अपघातात विमानातील अजित पवार, पायलट कॅप्टन सुमित, फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी या पाचही जणांना प्राण गमवावे लागले. या छोट्या चार्टर्ड विमानात ब्लॅक बॉक्स होता का? आणि त्याची तपासात मदत कशी होईल ? ते जाणून घेऊया.या विमानात ब्लॅकबॉक्स होता. लेअरजेट 45 हे विमान अत्यंत कडक सुरक्षा मानकांनुसार बनवले आहे . त्यात फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर दोन्ही आहेत, ज्यांना एकत्रितपणे “ब्लॅक बॉक्स” म्हणून संबोधले जाते.DGCA ची टीम आता ब्लॅक बॉक्स परत मिळवेल आणि त्याची चौकशी सुरू करेल. रिपोर्ट्सनुसार, लहान आणि खाजगी विमानांवर ब्लॅक बॉक्स अनिवार्य नसतात. पण जर चार्टर्ड विमानाचे वजन एका विशिष्ट वजनापेक्षा सामान्यतः ५,७०० किलोपेक्षा जास्त किंवा विमान वाहतूक प्राधिकरणाच्या नियमांनुसार जास्त असेल किंवा जर ते व्यावसायिकरित्या वापरले जात असेल तर फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर असणे अनिवार्य आहे.

ब्लॅक बॉक्स हा विमानाचा सर्वात मजबूत भाग असतो, जो (truth) अपघातानंतरही सुरक्षित राहतो. त्याचे दोन मुख्य भाग असतात CVR कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर हे वैमानिकांमधील शेवटचं संभाषण रेकॉर्ड करतं. अपघातापूर्वी कॉकपिटमध्ये कोणते अलार्म वाजले किंवा वैमानिकांनी कोणते आपत्कालीन संदेश दिले हे सीव्हीआर उघड करतं.FDR फ्लाइट डेटा रेकॉर्डर: यामध्य़े विमानाचा वेग, उंची, इंजिनची स्थिती आणि दिशा यासारख्या तांत्रिक डेटाची नोंद केली जाते.

नाव ‘ब्लॅकबॉक्स’ पण रंग असतो ‘नारिंगी’
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, याचं नाव ब्लॅक बॉक्स असलं तरी त्याचा रंग काळा नव्हे (truth) तर नारिंगी असतो. हा बॉक्स कोणत्याही ढिगाऱ्यात किंवा कचऱ्यात अथवा घनदाड जंगलात शोधणं सोपं व्हाव म्हणून याचा रंग असा नारिंगी असतो. त्यात एक बीकन देखील असतो जो पाण्याखाली किंवा जमिनीखाली असतानाही 30 दिवस सिग्नल पाठवत राहतो.

VSR व्हेंचर्सचा विवादीत इतिहास
अजित दादांचा अपघात झाला ते विमान VSR व्हेंचर्स कंपनीचं असून त्याचा (truth) इतिहास वादग्रस्त आहे,तपासाधीन आहे. 2011 मध्ये स्थापन झालेल्या या दिल्लीस्थित कंपनीचा 14 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई विमानतळावर विमान अपघात झाला होता. आता बारामतीच्या या दुर्घटनेनंतर, कंपनीच्या सुरक्षा ऑडिट आणि विमान देखभालीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

कसे उलगडणार गूढ ?
या विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाल्यावर त्यातील डेटा कॉम्प्युटरवर डीकोड केला जाईल, ज्यामुळे अपघात तांत्रिक बिघाड, हवामान किंवा मानवी चुकीमुळे झाला आहे की नाही हे स्पष्ट होईल. 9752 किलो वजनाचे हे विमान लँडिंग स्ट्रिपपर्यंत का पोहोचू शकले नाही याचे उत्तर आता ब्लॅक बॉक्समध्ये अडकले आहे.

हेही वाचा :

मराठी रीलस्टार प्रथमेश कदमचे दुःखद निधन; चाहत्यांना मोठा धक्का!

प्रत्येक गोष्टीत राजकारण कशाला?…

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ग्रामीण भागातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा झणझणीत काळ मटण, नोट करून घ्या रेसिपी