महाविकास आघाडी आता शिव-शाहू विकास आघाडी म्हणून इचलकरंजी महापालिका(parties)निवडणूक रिंगणात उतरणार आहे. या आघाडीत मँचेस्टर आघाडीसह एकूण दहा पक्षांचा समावेश आहे. याबाबतची घोषणा आज केली. काँग्रेस भवनमध्ये या आघाडीचा नावाचे अनावरण करण्यात आले.या आघाडीकडून एका चिन्हावर सर्व उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी आमची ही लढाई असणार आहे. यामध्ये मतदार आमच्या पाठीशी राहतील. त्यामुळे या निवडणुकीत शिव-शाहू विकास आघाडीचा पहिला महापौर होईल, असा विश्वास आघाडीतील नेतेमंडळींनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

यावेळी माजी आमदार राजू आवळे, राजीव आवळे, शशांक बावचकर, (parties)सागर चाळके, मदन कारंडे, प्रकाश मोरबाळे, मलकारी लवटे, सदा मलाबादे, भरमा कांबळे, रवी गोंदकर, रणजित जाधव, प्रताप पाटील, वसंत कोरवी, सुनी बारवाडे, हेमंत वणकुंद्रे आदी उपस्थित होते.यापूर्वीच सर्व पक्ष एकत्र येऊन एकाच चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शिव – शाहू विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली महापालिकेची निवडणूक लढवली जाणार आहे. निवडणूक आयोगाकडे या आघाडीची रितसर नोंदणी केली आहे.

लवकरच आघाडीची सहभागी घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश (parties)असलेली एक समिती नियुक्त केली जाणार आहे, असे बावचकर यांनी सांगितले.शिव-शाहू विकास आघाडीकडून महापालिका निवडणुकीत कप-बशी, शिट्टी व गॅस सिलिंडर अशा तीन चिन्हांना प्राधान्य दिले जाणार आहे. यातील एक चिन्ह मिळण्याबाबत मागणी केली जाईल. चिन्ह मिळाल्यानंतर एकत्रित प्रचाराला सुरुवात करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.

शिव-शाहू विकास आघाडीतील घटक पक्ष
१) काँग्रेस २) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ३) शिवसेना (ठाकरे गट) ४) मँचेस्टर आघाडी ५) मनसे ६) माकप ७) आप ८) स्वाभिमानी शेतकरी संघटना ९) समाजवादी पार्टी १०) लाल निशाण पक्ष

हेही वाचा :

नवीन वर्षात गृहिणींना मोठं गिफ्ट! गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार?

भारताच्या या राज्यात दारूच्या बाटल्यांना ‘Z+’ सुरक्षा, कारण काय?

‘3 इडियट्स’नंतर आता ‘4 इडियट्स’; आमिर खानच्या चित्रपटात चौथ्या