इचलकरंजीतील एका खाजगी शाळेत धक्कादायक घटना समोर आली आहे.(studying) तिसरीत शिकणाऱ्या एका चिमुकलीला किरकोळ कारणावरून महिला शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वर्गातील एका छोट्या कारणावरून शिक्षिकेने रागाच्या भरात विद्यार्थिनीला मारहाण केली. या मारहाणीमुळे मुलीच्या शरीरावर जखमेच्या खुणा दिसून येत असून, ती मानसिकदृष्ट्याही भयभीत झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पालकांनी शाळा प्रशासनाकडे तीव्र संताप व्यक्त केला. .(studying)“शाळा म्हणजे संस्काराचं मंदिर असताना अशा प्रकारची अमानुष वागणूक अजिबात खपवून घेतली जाणार नाही,” अशी प्रतिक्रिया पालकांनी दिली आहे.

दरम्यान, संबंधित शिक्षिकेविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, .(studying)अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. या प्रकरणाची चौकशी होणार का आणि शाळा प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण इचलकरंजीचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
केळीच्या पानावर का खावे? केळीच्या पानावर खाण्याचे फायदे काय? जाणून घ्या
महेंद्रसिंह धोनी IPL ला रामराम ठोकणार; ‘या’ दिग्गज खेळाडूचा खळबळजनक दावा
वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा, आता तिकीट स्टेटस 10 तास आधीच पाहता येणार