चेन्नई सुपर किंग्सचा सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या(retirement)निवृत्तीच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर आला आहे. आयपीएल 2026 नंतर धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची दाट शक्यता असल्याचा मोठा दावा सीएसकेचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पाने केला आहे. धोनी सध्या खेळाडू म्हणून नव्हे तर भविष्यातील मार्गदर्शक म्हणून स्वतःची भूमिका बदलत असल्याचे संकेत चेन्नई सुपर किंग्सच्या रणनीतीतून स्पष्टपणे दिसत असल्याचं उथप्पाचं मत आहे.44 वर्षांचा धोनी मागील काही हंगामांपासून मर्यादित भूमिका बजावत असून संघाच्या निर्णय प्रक्रियेत त्याचा प्रभाव अधिक वाढलेला दिसतो. आयपीएल 2026 हा धोनीचा शेवटचा हंगाम ठरू शकतो, असा दावा करत उथप्पाने सीएसकेच्या लिलावातील हालचालींचा थेट संदर्भ दिला आहे. अनुभवी खेळाडूंऐवजी तरुण आणि अनकॅप्ड खेळाडूंवर मोठी गुंतवणूक करण्याचा सीएसकेचा कल हा धोनीनंतरच्या काळाची तयारी असल्याचं चित्र समोर आणतो.

रॉबिन उथप्पाच्या मते, सीएसके आता भविष्यासाठी मजबूत कोर तयार करत आहे. (retirement)मागील हंगामात डेवाल्ड ब्रेविस, आयुष म्हात्रे आणि उर्विल पटेल यांसारख्या तरुण खेळाडूंना संधी देत संघाने सकारात्मक निकाल मिळवले. या यशामुळे फ्रँचायझीचा आत्मविश्वास वाढला असून धोनीच्या नेतृत्वाखाली उभा राहिलेला अनुभव आता नव्या पिढीकडे हस्तांतरित केला जात असल्याचे संकेत मिळत आहेत.आयपीएल 2026 च्या मिनी-लिलावात हा बदल अधिक ठळकपणे दिसून आला. चेन्नईने उत्तर प्रदेशचा 19 वर्षीय बिग-हिटर प्रशांत वीर आणि 20 वर्षीय यष्टीरक्षक-फलंदाज कार्तिक शर्मा यांना प्रत्येकी 14.2 कोटी रुपयांना विकत घेतलं. या दोघांवर करण्यात आलेली विक्रमी गुंतवणूक ही धोनीनंतरच्या संघरचनेची स्पष्ट झलक असल्याचं उथप्पाने नमूद केलं आहे.

सध्या आयपीएल 2025 च्या पार्श्वभूमीवर धोनी सीएसकेकडून तळाच्या फळीतील पॉवर हिटर (retirement)आणि यष्टीरक्षक म्हणून भूमिका बजावत आहे. ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर धोनीने पुन्हा एकदा संघाचं नेतृत्व स्वीकारत आपला प्रभाव सिद्ध केला होता. मात्र, आता मैदानावरील जबाबदाऱ्या कमी करून पडद्यामागून संघ घडवण्यावर त्याचा भर असल्याचं स्पष्ट होत आहे.उथप्पाच्या मते, संजू सॅमसनच्या ट्रेडनंतर धोनीसाठी मेंटॉरची भूमिका अधिक सुलभ झाली आहे. “सगळे संकेत स्पष्ट आहेत. हे एमएस धोनीचं शेवटचं सत्र ठरण्याची शक्यता आहे,” असं ठाम मत उथप्पाने व्यक्त केलं.

सीएसकेने सरफराज खान आणि राहुल चहर यांसारख्या तरुण(retirement) खेळाडूंना संघात सामील करून घेत दीर्घकालीन योजना आखली असून ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली नवा अध्याय सुरू करण्याची तयारी सुरू आहे. गेल्या पाच वर्षांपासून धोनीच्या निवृत्तीबाबत चर्चा सुरू असल्या तरी 2023 च्या विजेतेपदानंतरही त्याने खेळ सुरू ठेवला. चाहत्यांचा अपार पाठिंबा आणि परिपूर्ण निरोपाची इच्छा यामुळे धोनीने मैदान सोडण्याचा निर्णय पुढे ढकलला. मात्र, आयपीएल 2026 च्या लिलावातील आकडे आणि सीएसकेची रणनीती पाहता धोनीनंतरच्या काळासाठी फ्रँचायझी सज्ज होत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.

हेही वाचा :

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! ‘हे’ आयडी कार्ड असणं बंधनकारक

ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी आमदार भाजपच्या वाटेवर

 JIOने दिली खुशखबर! 2026 मध्ये रिचार्ज होणार स्वस्त, फक्त १०३ रुपयांपासून सुरुवातEdit