सध्या भारतात जिओचे सिम कार्डचे युजर्स मोठ्या संख्येने पाहायला मिळतात.(Recharge) या युजर्सना आत्तापर्यंत जिओचा महाग रिचार्ज करावा लागत होता. मात्र येणाऱ्या नव्या वर्षात रिलायन्स जिओने काही भन्नाट स्वस्त रिचार्ज प्लान आणले आहेत. याची किंमत फक्त १०३ रुपयांपासून सुरु होते. तीन रिचार्ज पर्यायांमध्ये डेटा, कॉलिंग, वर्षाचे सबस्क्रिप्शन प्लॅन, गुगल जेमिनी AI प्रो सेवा आणि बऱ्याच गोष्टी असणार आहेत. त्यामुळे आता जिओ युजर्सना मालामाल होण्याची संधी मिळणार आहे.

जिओच्या नव्या प्लॅनमध्ये सर्वात स्वस्त पर्याय म्हणजे ‘फ्लेक्सी पॅक’ आहे. (Recharge)याची किंमत १०३ रुपये आहे. जो २८ दिवसांसाठी असून एकूण ५ जीबी डेटा यामध्ये मिळणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये युजर्सना ओटीटी मनोरंजन पॅकमधून हिंदी, आंतरराष्ट्रीय किंवा इतर प्रादेशिक कंटेटपैकी एक पर्याय निवडू शकता.तसेच जिओने सुपर सेलिब्रेशन मंथली प्लॅन देखील सादर केला आहे, ज्याची किंमत ५०० रुपये आहे. याचा कालावधी २८ दिवासांचा असणार आहे. ज्यामध्ये दिवसाला २ जीबी डेटा, अनलिमीटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि एक्सट्रा ५ जीबी डेटा अॅक्सेसची सुविधा मिळते.
विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये YouTube प्रीमियम, जिओहॉटस्टार, (Recharge)अमेझॉन प्राइम व्हिडिओ, सोनी लिव्ह, झी५ यांसारख्या ओटीटी प्लाटफॉर्मचा समावेश असणार आहे. या प्लानसोबत तुम्हाला १८ महिन्यांचा मोफत गुगल जेमिनी प्रो प्लॅन देण्यात येणार आहे. जिओटीव्ही आणि जिओएआय क्लाउडचे जास्त फायदेही मिळतात.वर्षभराचा रिचार्ज प्लान करत असाल तर जिओने हिरो अॅन्युअल रिचार्ज हा वार्षिक प्लान दिला आहे.

यामध्ये ३,५९९ रुपयांमध्ये तब्बल ३६५ दिवसांचा हा प्लानचा लाभ घेता येणार आहे(Recharge). दर दिवसाला २.५ जीबी डेटा, अनलिमिडेट कॉल्स, १०० एसएमएस आणि एक्सट्रा ५ जीबी डेटा अॅक्सेस मिळतो.तर १८ महिने फ्री गुगल जेमिनी प्रो प्लॅन, जिओटीव्ही आणि जिओएआय क्लाउडचे तुम्ही वापरू शकता. एकूणच, जिओ हॅपी न्यू इयर २०२६ प्लॅनद्वारे कंपनीने कमी बजेटपासून ते प्रीमियम वापरकर्त्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक पर्याय उपलब्ध करून दिले असून नववर्षाच्या सुरुवातीलाच ग्राहकांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा :
इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी…
इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी…
WhatsApp Call वर बोलताना तुमचं लोकेशन होईल ट्रॅक, आत्ताच करा ही सेटिंग