मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या खूप चर्चा सुरु आहे.(payment)लाडकी बहीण योजनेत आता महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. यासाठी ३१ डिसेंबर ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. दरम्यान, जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. दरम्यान, केवायसी केल्यानंतरही निकषात न बसणाऱ्या महिलांचे लाभ बंद केले जाणार आहे.लाडकी बहीण योजनेत ज्या महिला केवायसी करणार नाही त्यांना लाभ मिळणार नाही. याचसोबत फक्त पात्र महिलांनाच लाभ मिळणार आहे. योजनेचा लाभ मिळणार आहे. अपात्र लाभार्थ्यांची नावे आपोआप वगळली जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेत गोपनियता राहण्यासाठी केवायसी करण्याचा निर्णय घेतला आहे. (payment)दरम्यान,केवायसी केल्यानंतर ज्या महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे.ज्या महिला वयोगटात बसत नाही किंवा ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे. एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे.

त्यामुळे अपात्र असूनही जर तुम्ही केवायसी केली तर तुमचा लाभ बंद केला जाणार आहे.(payment)लाडकी बहीण योजनेत पती आणि वडिलांचीही केवायसी करावी लागणार आहे. यावरुन महिलांच्या कुटुंबाच्या उत्पन्नाची माहिती मिळणार आहे. ईकेवायसी केल्यानंतर सर्व माहिती प्राप्तिकर विभागाकडे दिली जाईल.प्राप्तिकर विभागाने पडताळणी केल्यानंतर अपात्र महिलांचा लाभ बंद केला जाईल.

हेही वाचा :

इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी…

इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी…

WhatsApp Call वर बोलताना तुमचं लोकेशन होईल ट्रॅक, आत्ताच करा ही सेटिंग