भारतीय क्रिकेट मंडळाच्या 31व्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी (salaries)टीम इंडियातील दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या कराराबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. 22 डिसेंबरला होणाऱ्या या बैठकीत सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये मोठा बदल अपेक्षित असल्याचे संकेत मिळत आहेत. मागील वर्षभरात कोहली आणि रोहित यांनी टेस्ट आणि T20 फॉर्मॅटमधून निवृत्ती घेतली असून ते आता फक्त वनडे क्रिकेटमध्येच सक्रिय आहेत. अशा परिस्थितीत दोघांच्या करारातील ग्रेडवर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी माहिती पुढे आली आहे.मागील करार चक्रात विराट आणि रोहित A+ ग्रेडमध्ये होते. या वर्गात जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजाचा देखील समावेश आहे. मात्र हे दोघेही फक्त एका फॉर्मॅटमध्ये खेळत असल्याने A+ वर्गात ठेवणे त्यांना कठीण होईल, अशा चर्चा आहे.त्यामुळे A+ वर्गातून बाहेर पडल्यास त्यांचा वार्षिक करार 7 कोटींवरून 5 कोटींवर येऊ शकतो, म्हणजेच तब्बल 2 कोटी रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे.

BCCI सध्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टचे पुनर्रचना करत असून, (salaries)खेळाडूंच्या फॉर्मॅटनिहाय उपलब्धतेनुसार ग्रेडिंग ठरवण्याचा विचार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा फक्त वनडे क्रिकेट खेळत असल्याने त्यांना A ग्रेडमध्ये ढकलले जाण्याची शक्यता वर्तवली जाते. A+ ग्रेडमध्ये राहण्यासाठी सर्व फॉर्मॅटमध्ये सातत्याने उपलब्धता आणि कामगिरी आवश्यक असते, आणि त्यासाठी दोन्ही अनुभवी खेळाडूंचे निकष सध्या जुळत नाहीत.याउलट, सध्या टीम इंडियाची कमान सांभाळणारा शुभमन गिल मात्र सर्व फॉर्मॅटमध्ये सातत्याने खेळत आहे. गेल्या वर्षभरात त्याने आपल्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण सामने जिंकले आहेत आणि फलंदाज म्हणूनही उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच या AGM मध्ये गिलला A+ ग्रेडमध्ये बढती मिळण्याची शक्यता दाट आहे. जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा हे मात्र A+ मध्ये कायम राहतील, असे संकेत आहेत.

AGMमध्ये केवळ पुरुष खेळाडूंच्या करारांवरच नाही तर महिला (salaries) क्रिकेटपटूंच्या करार रचनेवरही सविस्तर चर्चा होणार आहे. महिला देशांतर्गत खेळाडूंचे वेतन वाढवण्याचे प्रस्ताव पुढे येऊ शकतात. तसेच अंपायर्स आणि मॅच रेफरींच्या फीमध्ये वाढ करण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव देखील सादर केला जाणार आहे. त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.BCCI मध्ये अलीकडेच मोठे प्रशासनिक बदल झाले असून, ही AGM त्या बदलांनंतरची पहिली मोठी बैठक ठरणार आहे. मिथुन मनहास अध्यक्ष झाले आहेत, रघुराम भट्ट कोषाध्यक्ष झाले, तर देवजीत साइकिया सचिव बनले आहेत. प्रभतेज सिंग भाटिया यांची संयुक्त सचिव म्हणून नियुक्ती झाली असून जयदेव शाह नवीन काउन्सलर झाले आहेत. या नव्या समितीसमोर हा पहिला मोठा निर्णय असेल आणि त्यामुळे सर्वांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.
हेही वाचा :
शेतकरी बांधवांनो, ‘ही’ अट पूर्ण करा, अन्यथा कर्जमाफी मिळणार नाही!
सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपद काढा, स्टार क्रिकेटरचं धक्कादायक विधान
१ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू होणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट