आयपीएल 2026 च्या मिनी लिलावासाठी अंतिम यादी तयार आहे.(players)यावेळी लिलावासाठी 350 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तर 1005 खेळाडूंना लिलावा आधीच बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आता प्रमुख खेळाडूंसाठी पाच गट केले आहेत. पहिल्याच फेरीत त्यांच्यावर बोली लागेल. पहिल्या गटात दिग्गज खेळाडू असणार आहेत. या गटाकडे सर्वच फ्रेंचायझींचं लक्ष लागून आहे. हे खेळाडू मिनी लिलावात चांगला भाव खाऊ शकतात. गस अॅटकिन्सन इंग्लंड, वनिंदू हसरंगा श्रीलंका, दीपक हुडा भारत, वेंकटेश अय्यर भारत, लियाम लिव्हिंगस्टोन इंग्लंड, वियान मुल्डर दक्षिण आफ्रिका, रचिन रवींद्र न्यूझीलंड हे खेळाडू आहेत.

दुसऱ्या टप्प्यात डेव्हॉन कॉनवे न्यूझीलंड, जेक फ्रेझर-मॅकगर्क ऑस्ट्रेलिया, कॅमरून ग्रीन ऑस्ट्रेलिया, सरफराज खान भारत, डेव्हिड मिलर दक्षिण आफ्रिका, पृथ्वी शॉ भारत हे खेळाडू आहे. (players)विशेष म्हणजे पृथ्वी शॉ आणि सरफराज खान यांना मागच्या लिलावात कोणीच घेतलं नव्हतं. त्यामुळे आता त्यांच्यासाठी कोण बोली लावतं याकडे लक्ष असेल. तिसऱ्या टप्प्यात यष्टीरक्षक खेळाडू असतील. यात फिन एलन न्यूझीलंड, जॉनी बेअरस्टो इंग्लंड, केएस भरत भारत, क्विंटन डी कॉक दक्षिण आफ्रिका, बेन डकेट इंग्लंड, रमनउल्लाह गुरबाज अफगाणिस्तान, जेमी स्मिथ इंग्लंड यांचा समावेश आहे.

चौथ्या टप्प्यात वेगवान गोलंदाज असतील. (players)जेराल्ड कोएत्झी दक्षिण आफ्रिका, आकाश दीप भारत, जेकब डफी न्यूझीलंड, फजलहक फारुकी अफगाणिस्तान, मॅट हेन्री न्यूझीलंड, स्पेन्सर जॉन्सन ऑस्ट्रेलिया, शिवम मावी भारत, अँरिक नोकिया दक्षिण आफ्रिका, मथीशा पाथिराना श्रीलंका हे खेळाडू आहेत. पाचव्या टप्प्यात फिरकीपटूंची संच असेल. यात रवी बिश्नोई भारत, राहुल चहर भारत, अकील हुसेन वेस्ट इंडिज, मुजीब उर रहमान अफगाणिस्तान, महेश तिशाना श्रीलंका यांची नावं असतील.
हेही वाचा :
चिकन, मासे किती काळ फ्रीजमध्ये ठेवले जाऊ शकते? कधी खराब होते? इथे वाचा
महापालिका निवडणुका फेब्रुवारीत? आचारसंहिता कधीपासून? राज्यातील बड्या मंत्र्याचा अंदाज काय?
वर्षाच्या अखेरच्या महिन्यात या राशींना मेगा लॉटरी! बाबा वेंगाची छप्परफाड भविष्यवाणी