सरकारी कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहे.(implemented)दरम्यान, आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अनेकांच्या म्हणण्यांनुसार, आठवा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. मात्र, संसदेत याबाबत चर्चा झाली.संसदेत मंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, आठवा वेतन आयोग १ जानेवारीपासून लागू होणार की नाही हे अजूनपर्यंत ठरले नाही. यामुळे देशातील ५० लाखांपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर आठव्या वेतन(implemented)आयोगाबाबत अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. दरम्यान, यावर सरकारने अजूनपर्यंत कोणतीही माहिती दिलेली नाही. याबाबत आयोग आपल्या शिफारशी १८ महिन्यात सादर करणार आहेत. यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल.संसदेत चर्चेदरम्यान सांगण्यात आले की, केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांची संख्या ५०.१४ लाख आहे तर पेन्शनधारकांची संख्या ६९ लाख आहे.

कर्मचारी आणि पेन्शनधारकांना योजनेचा लाभ मिळणार आहे.(implemented)काही दिवसांपूर्वी सरकारने टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी दिली होती. यामध्ये आयोग मूळ वेतन, पेन्शन, अलाउंस आणि इतर सुविधांना लक्षात घेऊन शिफारसी तयार करतात. यानंतर आयोग फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल करेल. यानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली जाईल.

हेही वाचा :

चिकन, मासे किती काळ फ्रीजमध्ये ठेवले जाऊ शकते? कधी खराब होते? इथे वाचा

महापालिका निवडणुका फेब्रुवारीत? आचारसंहिता कधीपासून? राज्यातील बड्या मंत्र्याचा अंदाज काय?

वर्षाच्या अखेरच्या महिन्यात या राशींना मेगा लॉटरी! बाबा वेंगाची छप्परफाड भविष्यवाणी