बाजारात एखादी गोष्ट खरेदी करायला गेल्यावर बरेचदा आपल्याकडे सुट्टे पैसे नसतात.(money) यावेळी आपण ५,१०, २० रुपयांची नाणी देतो. दरम्यान, अनेकदा ही नाणी घेण्यास अनेक दुकानदार नकार देतात. ही नाणी बाजारात चालत नाही, अशी उत्तरे देतात. त्यामुळे खरंच ही नाणी बाजारात चालत नाही का, नाणी चलनातून बाद झाली तर नाही ना असा प्रश्न अनेकांना पडतो. दरम्यान, आता याबाबत रिझर्व्ह बँकेने माहिती दिली आहे.

रिझर्व्ह बँकेने म्हटलंय की, ₹५० पैसे, ₹१, ₹२, ₹५, १०, आणि ₹२०ची नाणी अजूनही बाजारात वैध आहेत. ही नाणी बाजारात चालतात.सध्या वेगवेगळ्या नाण्यांबाबत अफवा पसरत आहेत. (money)१ रुपयांचे नाणे खोटे आहे, अनेकजण तर २ रुपयांचे नाणे घेण्यासदेखील नकार देतात. काही ठिकाणी १० रुपयांच्या नाण्यांवर वेगळी डिझाइन असल्याने हे नाणे खोटे तर नाही ना अशी शंका वर्तवली जाते. दरम्यान, आता रिझर्व्ह बँकेने या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.

रिझर्व्ह बँकेने सांगितले की, एकाच रुपयांची वेगवेगळ्या डिझाइनची नाणी असणे सामान्य आहेत.(money) वर्ष बदलल्यानंतर किंवा अनेक महत्त्वाच्या दिवसांच्या अनुषगांने नाण्यांवरील डिझाइन बदलण्यात आली आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे एखाद्या डिझाइनचे नाणे असेल तर ते वैध आहे.दुकानदार अनेकदा नाणी घेण्यास नकार देतात. याचसोबत अनेक रुपयांची नाणी परत देतात. दरम्यान, दुकानदारांना नाणी वैध असताना परत करता येणार नाही.रिझर्व्ह बँकेने नोटा आणि नाण्यांबाबतचा एक संदेश सोशल मीडियाद्वारे दिला आहे. नाणी बंद झाली आहेत, अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
हेही वाचा :
चिकन, मासे किती काळ फ्रीजमध्ये ठेवले जाऊ शकते? कधी खराब होते? इथे वाचा
महापालिका निवडणुका फेब्रुवारीत? आचारसंहिता कधीपासून? राज्यातील बड्या मंत्र्याचा अंदाज काय?
वर्षाच्या अखेरच्या महिन्यात या राशींना मेगा लॉटरी! बाबा वेंगाची छप्परफाड भविष्यवाणी