नोव्हेंबर महिन्यात म्युच्युअल फंडांनी शेअर बाजारात मोठी खरेदी केली आहे.(funds)किंबहुना, बाजारातील चांगली भावना आणि गुंतवणूकदारांकडून सतत वाढत जाणारा ओघ यामुळे फंड हाऊसेस आक्रमक खरेदीच्या स्थितीत राहिले. बाजारातील किरकोळ चढउतार असूनही, गुंतवणूकदारांच्या या शिस्तबद्ध धोरणामुळे उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्तेत वाढ होत आहे आणि शेअर बाजारालाही स्थिर पाठिंबा मिळत आहे.सेबीच्या ताज्या आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंडांनी नोव्हेंबरमध्ये एकूण ४३,४६५ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले, जे ऑक्टोबरमधील २०,७१८ कोटी रुपयांच्या खरेदीपेक्षा दुप्पट आहे. बाजाराच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, फंड हाऊसेस जवळजवळ संपूर्ण महिना खरेदीदार राहिले.

अवघ्या दोन दिवसांत त्यांनी २.४७३ कोटी रुपये काढून घेतले.(funds) या सततच्या जोरदार खरेदीचा परिणाम शेअर बाजाराच्या हालचालीवरही दिसून आला आणि बेंचमार्क निर्देशांक वाढण्यास मदत झाली. तथापि, इक्विटीमधील गुंतवणुकीत वाढ झाल्यामुळे, डेट फंडांमध्ये मोठ्या प्रमाणात बहिर्वाह दिसून आला, नोव्हेंबरमध्ये, फंड हाउसने कर्ज श्रेणीतून ७२,२०१ कोटी रुपये काढले, तर ऑक्टोबर मध्ये ही रक्कम १२,७७१ कोटी रुपये होती. म्हणजेच डेट फंडातून पैसे काढल्यानंतर फंड हाऊस मोठ्या प्रमाणावर इक्विटीकडे वळले. ही मजबूत देशांतर्गत गुंतवणूक अशा वेळी येते जेव्हा किरकोळ गुंतवणूकदार आधीच एसआयपीच्या माध्यमातून सातत्याने गुंतवणूक करत आहेत.

तर, काही गुंतणुकदारांनी सोन्याकडे धाव घेतली आहे. (funds)सध्या देशभरात सोने-चांदीचे भाव वर-खाली होताना दिसून येत आहे. तज्ञांच्या मते, येत्या वर्षी सोन्याचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक करू इच्छितात. तसेच, फंड हाऊसेस इक्विटीकडे वळत आहेत. एसआयपीमध्ये सुमारे २९.५२९ कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर गुंतवणूक झाली आहे. तर, सप्टेंबर महिन्यात ही गुंतवणूक २९,३६१ कोटी रुपये होती. डेट फंडातून तब्बल ७२,२०१ कोटी रुपये काढले. तर, दोन दिवसात तो आकडा २,४७३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ऑक्टोबर महिन्यात २०,७१८ कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली.
हेही वाचा :
चिकन, मासे किती काळ फ्रीजमध्ये ठेवले जाऊ शकते? कधी खराब होते? इथे वाचा
महापालिका निवडणुका फेब्रुवारीत? आचारसंहिता कधीपासून? राज्यातील बड्या मंत्र्याचा अंदाज काय?
वर्षाच्या अखेरच्या महिन्यात या राशींना मेगा लॉटरी! बाबा वेंगाची छप्परफाड भविष्यवाणी