राज्यात शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.(condition) आर्थिक संकटांच्या मालिकेमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकरी वर्गाचा ताण वाढत असताना सरकारने या विषयावर हालचाली सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कर्जमुक्ती योजना राबवण्यात आली होती. मात्र अलीकडील परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे कर्ज पुन्हा वाढू लागल्याने सरसकट कर्जमाफीची मागणी वेग धरू लागली आहे.विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने कर्जमाफीचे आश्वासन दिल्याने शेतकरी वर्गात निर्णयाची मोठी अपेक्षा निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी कर्जमाफीला कोणतीही कमाल मर्यादा नसणार असून, मागील योजनांमधून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना देखील या प्रक्रियेत समाविष्ट करण्याचा विचार आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय जून 2026 पूर्वी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेत पात्र असूनही (condition)जवळपास 60 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला नव्हता. या वंचित शेतकऱ्यांपैकी काहींनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या. मे 2024मध्ये न्यायालयाने प्रशासनाला या तक्रारींवर योग्य निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काही काळ या प्रक्रियेत स्थिरता आली असली तरी आता पुन्हा शासनाने प्रकरणांना गती देण्यास सुरुवात केली आहे.यवतमाळ जिल्ह्यातील आठ शेतकरी तात्पुरते पात्र ठरवण्यात आले असून अकोला आणि अहिल्यानगरमधील प्रकरणांची तपासणी सुरू आहे.

मात्र पात्र शेतकऱ्यांसाठी सरकारने एक महत्त्वाची अट ठेवली आहे (condition) त्यांनी आयकरदाता नसल्याचे हमीपत्र द्यावे लागणार आहे. तपासणीत आयकरदाता असल्याचे सिद्ध झाल्यास मिळालेली कर्जमाफी परत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.या सर्व घडामोडींमुळे शेतकरी संघटनांनी केवळ न्यायालयीन लढाई करणाऱ्या शेतकऱ्यांचेच नव्हे तर सर्व प्रलंबित प्रकरणांचे तातडीने निराकरण करण्याची मागणी केली आहे. सात वर्षांपासून सुरु असलेली ही प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असल्याने राज्यातील शेतकरी आणि कृषी क्षेत्राचे लक्ष शासनाच्या आगामी निर्णयाकडे लागले आहे.
हेही वाचा :
चिकन, मासे किती काळ फ्रीजमध्ये ठेवले जाऊ शकते? कधी खराब होते? इथे वाचा
महापालिका निवडणुका फेब्रुवारीत? आचारसंहिता कधीपासून? राज्यातील बड्या मंत्र्याचा अंदाज काय?
वर्षाच्या अखेरच्या महिन्यात या राशींना मेगा लॉटरी! बाबा वेंगाची छप्परफाड भविष्यवाणी