वाढती महागाई आणि भविष्याची चिंता लक्षात घेता आज अनेक जण सुरक्षित (investments) गुंतवणुकीकडे वळत आहेत. विशेषतः निवृत्तीनंतर नियमित आणि खात्रीशीर उत्पन्न मिळावे, अशी अपेक्षा असणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसच्या सरकारी योजना मोठा आधार ठरत आहेत. याच योजनांपैकी एक म्हणजे पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Saving Scheme – SCSS), जी आजच्या घडीला बँक एफडीपेक्षाही अधिक परतावा देत असल्यामुळे चर्चेत आहे.पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांवर लोकांचा मोठा विश्वास आहे, कारण या पूर्णपणे शून्य-जोखीम गुंतवणूक मानल्या जातात. सरकारकडून गुंतवणुकीच्या सुरक्षिततेची हमी दिली जाते. SCSS योजनेअंतर्गत सध्या 8.2 टक्के व्याजदर दिला जात असून, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 17 हजार रुपयांपेक्षा जास्त नियमित उत्पन्न मिळू शकते.

या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी (investments) किमान रक्कम फक्त 1 हजार रुपये आहे, तर कमाल गुंतवणूक मर्यादा 30 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. एकदा खाते उघडले की गुंतवणूकदाराला तिमाही स्वरूपात व्याज मिळते, ज्यामुळे निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होतो. यासोबतच आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत करसवलतीचाही लाभ घेता येतो.

वयोमर्यादेच्या दृष्टीने ही योजना 60 वर्षे किंवा त्याहून (investments) अधिक वयाच्या व्यक्तींसाठी आहे. पती-पत्नी संयुक्त खातेही उघडू शकतात. काही विशेष प्रकरणांमध्ये वयाची सूट दिली जाते. स्वेच्छानिवृत्ती (VRS) घेतलेल्या व्यक्ती 55 ते 60 वयोगटात असतील तर ते खाते उघडू शकतात, तर निवृत्त संरक्षण कर्मचारी 50 ते 60 वयोगटात असतील तरी त्यांना या योजनेत गुंतवणूक करता येते. SCSS खात्याचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे. संपूर्ण कालावधीपर्यंत गुंतवणूक कायम ठेवल्यास योजनेचा पूर्ण लाभ मिळतो. नियमानुसार दर तीन महिन्यांनी व्याज खातेदाराच्या खात्यात जमा केले जाते. मात्र मॅच्युरिटीपूर्वी खाते बंद केल्यास ठरावीक दंड आकारला जातो. खातेधारकाचा मृत्यू झाल्यास खाते बंद करून संपूर्ण रक्कम नामनिर्देशित व्यक्तीला दिली जाते.

पोस्ट ऑफिसमध्ये हे खाते सहजपणे (investments) उघडता येते. वैयक्तिक खात्यात 15 लाख रुपये, तर संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. उदाहरणार्थ, जर एखाद्या गुंतवणूकदाराने संयुक्त SCSS खात्यात 25 लाख रुपये गुंतवले, तर त्यांना 8.2 टक्के व्याजदरानुसार पाच वर्षांसाठी तिमाही आधारावर 51,250 रुपये व्याज मिळते. याचा अर्थ मासिक उत्पन्न सुमारे 17,083 रुपये इतके होते. पाच वर्षांनंतर गुंतवलेली मूळ रक्कम परत मिळते किंवा खाते आणखी तीन वर्षांसाठी वाढवण्याचाही पर्याय उपलब्ध असतो.या योजनेचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे एकदा खाते उघडल्यावर संपूर्ण मॅच्युरिटी कालावधीसाठी तोच व्याजदर लागू राहतो. नंतर सरकारने तिमाही पुनरावलोकनात व्याजदरात बदल केला तरी विद्यमान खातेदारांच्या व्याजावर त्याचा परिणाम होत नाही. त्यामुळे पोस्ट ऑफिस SCSS योजना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता आणि नियमित उत्पन्न देणारी एक विश्वासार्ह योजना मानली जात आहे.

हेही वाचा :

आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा

अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

‘या’ जन्मतारखेला जन्मलेली लोक प्रचंड नशीबवान असतात; गुरू ग्रहाची असते मोठी