पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी २२व्या हप्त्याची वाट पाहत आहे.(Announcement) नोव्हेंबर महिन्यात २१ वा हप्ता जमा झाला होता. त्यानंतर पुढचा हप्ता कधी येणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. दरम्यान, लवकरच पीएम किसान योजनेच्या २२ व्या हप्त्याबाबत घोषणा होऊ शकते.त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील.पीएम किसान योजनेचा हप्ता दर चार महिन्यांनी दिला जातो. २१वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात येणे अपेक्षित होते. मात्र, हा हप्ता लांबणीवर गेला. त्यानंतरचा हप्ता फेब्रुवारीमध्ये येणार आहे. वर्षभरात ३ वेळा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात.

एकूम ६००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. (Announcement)दरम्यान, आता पुढच्या महिन्यात अर्थसंकल्पावेळी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.देशाचा २०२६-२७ साठीचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर होऊ शकतो. या अर्थसंकल्पात याबाबत निर्णय होऊ शकतो. त्यानंतर अर्थसकंकल्पानंतर २२ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बजेट सादर होण्याआधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत, असं सांगितलं जात आहे. अजूनही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

तुम्हाला पैसे येणार की नाही, असा चेक करा स्टेट्‍स सर्वात आधी (Announcement)तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.यानंतर फार्मर्स कॉनरवर क्लिक करा.यानंतर स्टेट्सवर क्लिक करा. स्टेट्‍स पाहण्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर आणि सिक्युरिटी कोड टाका.यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. तो टाकावा.

हेही वाचा :

इचलकरंजीत संजय तेलनाडेंसह कुटुंबातील दोन सदस्यांचाही विजय; राहुल आवाडेंच्या कट्टर समर्थकाचा पराभव

कोल्हापूरच्या प्रभाग क्रमांक४ मध्ये दोन गटात तुफान हाणामरी

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर