देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत.(Premium) यातील अनेक योजना या महिलांसाठी आहेत. यातील एक योजना म्हणजे एलआयसी विमा लक्ष्मी योजना. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. या योजनेत कोणत्याही प्रकारची रिस्क नाहीये. तुम्हाला सुरक्षित परतावा मिळतो.एलआयसी विमा योजना प्लान ८८१ ही महिलांसाठी सुरु करण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला सुरक्षादेखील मिळतो याचसोबत गॅरंटीड लाभदेखील मिळतो. वीमा लक्ष्मी मनी बॅक लाइफ इन्श्युरन्समध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. यामध्ये तुम्हाला बचतीसोबतच वीमा कव्हरदेखील मिळणार आहे.

वीमा लक्ष्मी मनी बॅक लाइफ इन्श्युरन्स पॉलिसीचा लाभ देशातील कोणतीही (Premium)महिला घेऊ शकतात. १८ ते ५० वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. अल्पवयीन मुलींसाठी त्यांचे आईवडील खाते उघडू शकतात. या पॉलिसीचा कालावधी २५ वर्षांचा आहे.प्रमियम भरण्याची मुदत ७ ते १५ वर्षापर्यंत निवडता येते.विमा लक्ष्मी योजनेअंतर्गत बचत आणि संरक्षणाची हमी मिळते. या योजनेत दर दोन किंवा चार वर्षांनी एक निश्चित रक्कम दिली जाते. याला सर्व्हाव्हल बेनिफिट मिळते. दरवर्षी तुम्हाला प्रिमियम मिळतो. प्रिमियम ७ टक्के असणार आहे. यामुळे मॅच्युरिटीच्या वेळी जमा रक्कम आणि प्रिमियम मिळतो. तसेच या योजनेत आरोग्य रायडर म्हणजे कोणताही गंभीर आजार किंवा अतिरिक्त कव्हर निवडण्याची सुविधा मिळतो. या योजनेत ३ वर्षांच्या प्रिमियमनंतर ऑटो कव्हर आणि पॉलिसी कर्जदेखील दिले जाते. या योजनेत टॅक्समध्येही सवलत मिळते.

दर महिन्याला जर तुम्ही ४,४५० रुपयांचा प्रिमियम भरला तर तुम्ही १६ लाख रुपये (Premium)मिळवू शकतात. जर तुमचे वय ४० असेल आणि विमा रक्कम ३० लाखांची असेल तर महिन्याला ४,४५० रुपये भरायचे आहे. तुम्हाला १५ वर्षांसाठी हे पैसे भरायचे आहेत. तुम्हाला मॅच्युरिटीवर १३,०९,२६० रुपयांचा नफा मिळणार आहे. दर दोन वर्षांनी २२,५०० रुपयांचा सर्व्हयवल बेनिफिट मिळेल. म्हणजेच तुम्हाला एकूण १५,७९,२६० रुपये मिळणार आहे. यातील ८,०७,०७५ रुपये ही तुम्ही भरलेले असतील. म्हणजेच तुम्हाला १५ वर्षांसाठी पैसे भरायचे आहे. २५ वर्षानंतर तुम्हाला १६ लाख रुपये मिळतील.

हेही वाचा :

इचलकरंजीत संजय तेलनाडेंसह कुटुंबातील दोन सदस्यांचाही विजय; राहुल आवाडेंच्या कट्टर समर्थकाचा पराभव

कोल्हापूरच्या प्रभाग क्रमांक४ मध्ये दोन गटात तुफान हाणामरी

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर