जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नऊ लाख लाभार्थी राहिले आहेत.(received) त्या सर्व महिलांना ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करून घ्यावी लागणार आहे. मुदतीत ई-केवायसी न करणाऱ्या लाडक्या बहिणींचा लाभ कायमचा बंद होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील तीन लाख ७७ हजार महिलांनी अजूनही ई-केवायसी केलेली नाही. दरम्यान, नोव्हेंबर व डिसेंबर या दोन्ही महिन्याचा लाभ महिलांना ३१ डिसेंबरपर्यंत वितरीत होणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख नऊ हजार महिलांनी अर्ज केले होते. त्यांना सुरवातीचे तीन-चार महिने लाभ मिळाला. (received)पण, योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार पडताळणी झाली. त्यानुसार संजय गांधी निराधार योजना, चारचाकी वाहने, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला, २१ पेक्षा कमी व ६५ पेक्षा जास्त वय असलेल्या महिलांसह शासकीय कर्मचारी महिलांचा लाभ बंद करण्यात आला. या निकषांत जिल्ह्यातील दोन लाख महिला अपात्र ठरल्या.
आता शेवटच्या निकषांनुसार ई-केवायसी करून घेतली जात आहे. (received)त्यातून लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे की कमी, हे स्पष्ट होणार आहे. त्यात एकट्या सोलापूर जिल्ह्यातील अंदाजे तीन लाखांवर महिला अपात्र ठरतील, असा अंदाज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना ई-केवायसी करून घेण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. योजनेचा लाभ नियमित सुरू राहण्यासाठी सर्व लाभार्थी महिलांनी मुदतीत ई-केवायसी करून घ्यावी. सोलापूर जिल्ह्यातील ६० ते ६५ टक्के महिलांनी ई-केवायसी केली असून उर्वरित महिलांनीही ती प्रक्रिया करून घ्यावी.

लाडक्या बहिणींना ई-केवायसी करून घेण्यासाठी सध्या ३१ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. (received)अजूनही राज्यातील ८० लाख महिलांनी ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे तिसऱ्यांदा ई-केवायसीसाठी मुदत मिळेल, असा अंदाज आहे. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचा लाभ सर्वांना मिळेल. पण, फेब्रुवारीपासून ई-केवायसी केलेल्या महिला लाभार्थींनाच योजनेचा लाभ दिला जाईल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
सुरवातीच्या लाभार्थी
११.०९ लाख
पडताळणीत अपात्र महिला
२.१३ लाख
ई-केवायसी केलेल्या महिला
५.१९ लाख
ई-केवायसी राहिलेले लाभार्थी
३.७७ लाख
हेही वाचा :
चिकन, मासे किती काळ फ्रीजमध्ये ठेवले जाऊ शकते? कधी खराब होते? इथे वाचा
महापालिका निवडणुका फेब्रुवारीत? आचारसंहिता कधीपासून? राज्यातील बड्या मंत्र्याचा अंदाज काय?
वर्षाच्या अखेरच्या महिन्यात या राशींना मेगा लॉटरी! बाबा वेंगाची छप्परफाड भविष्यवाणी