जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (group)सांगोल्याचे राजकारणात पुन्हा उलथापालथ होणार आहे. राष्ट्रवादीतून ठाकरे गटात प्रवेश करणारे माजी आमदार दीपक साळुंखे पाटील पुन्हा दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवार यांच्या गट राष्ट्रवादीतून ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर माजी आमदार दीपक साळुंखे पाटील आता भाजपमध्ये आपलं बस्तान बसवणार आहेत, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झालीय.भाजपमध्ये जाण्याबाबत स्वत: माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी एका मेळाव्यात सुतोवाच केलेत. सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे पाटील भाजपच्या वाटेवर असल्यानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी पूर्वी साळुंखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

दीपक साळुंखे पाटील गटाचा सांगोल्यात मेळावा झाला, (group)यावेळी त्यांनी भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिलेत. यासह आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या सोबत युती करणार अशी घोषणाही त्यांनी केलीआपण सांगोल्यात गेली ४० वर्ष राजकारण करतोय. आपण कोणत्याच पक्षात आणि गटात नाही. दीपक आबा साळुंखे पाटील परिवार अशीच आम्ही सांगोला नगरपरिषदेची निवडणूक लढवली. आपण आणि विद्यमान आमदार बाबासाहेब तसेच भाजप अशी तिघे मिळवून निवडणूक लढवली.

आगामी काळात जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत,(group) त्या कशा पद्धतीने लढल्या जाव्यात याबाबत कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी बैठक बोलावली, परंतु कार्यकर्ते अधिक आल्यानं त्याला मेळाव्याचं स्वरुप आलं.जिल्हा परिषदेसाठी आपण आणि शेतकरी कामगार पक्ष आमदार बाबासाहेब देशमुख आणि जयकुमार गोरे असे तिघेजण एकत्र येणार आहोत. त्यानुसार निवडणुका लढवणार आहोत. जर यात कोणाला अजून घ्यायचे असेल तर त्याबाबतही निर्णय घेतला जाईल, असं साळुंखे पाटील म्हणाले. यासह त्यांनी आपण पुढील भविष्यात भाजपमध्ये जाणार असल्याचं सुतोवाच दीपक साळुंखे पाटील यांनी यावेळी केलेत.

हेही वाचा :

इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी…

इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी…

WhatsApp Call वर बोलताना तुमचं लोकेशन होईल ट्रॅक, आत्ताच करा ही सेटिंग