राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.(suffers)15 जानेवारीला मतदान पार पडणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. आता अनेक नेत्यांनी पक्षांतरालाही सुरुवात केली आहे. अनेक बडे नेते आपल्या सोयीनुसार पक्षांतर करत आहेत. बरेच नेते महाविकास आघाडीतून महायुतीत प्रवेश करताना दिसत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. अशातच आता नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला. काँग्रेस आणि मनसेच्या 3 बड्या नेत्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद वाढली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नांदेड महानगर पालिकेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. (suffers)काँग्रेसच्या माजी महापौर जयश्री पावडे आणि माजी उपमहापौर सतीश देशमुख यांच्यासह मनसे जिल्हाध्यक्ष विनोद पावडे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. या तिन्ही नेत्यांनी आज महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलायय. या पक्षप्रवेशानंतर नांदेड मध्ये काँग्रेसची समीकरणे बदलली असून भाजपची ताकद वाढली आहे.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रतिक्रिया माजी महापौर देताना जयश्री पावडे यांनी म्हटले की, (suffers)अशोकराव चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार भाजपात प्रवेश केला. आम्ही विकासात्मक दृष्टीवर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश केला. काँग्रेस पक्ष चांगला आहे. मात्र आम्ही सुरुवातीपासून भाजपाच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. तसेच माजी उपमहापौर सतीश देशमुख यांनी म्हटले की, विकासाच्या दृष्टिकोनातून आणि जनतेची काम होण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे, आमचे नेते सुद्धा भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला.

नांदेडमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेलाही मोठा धक्का बसला आहे. (suffers)जिल्हाध्यक्ष विनोद पावडे यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. याबाबत बोलताना विनोद पावडे म्हणाले की, अशोकराव चव्हाण यांच्यासोबत चर्चा करून मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, या पक्षप्रवेशांमुळे भाजपची ताकद वाढली आहे, तर काँग्रेस आणि मनसेला मोठा धक्का बसला आहे. याचा परिणाम आगामी महापालिका निवडणुकीत जाणवणार आहे.

हेही वाचा :

इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी…

इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी…

WhatsApp Call वर बोलताना तुमचं लोकेशन होईल ट्रॅक, आत्ताच करा ही सेटिंग