राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील महापालिका निवडणुकांची घोषणा केली आहे.(announcement)या घोषणेनुसार राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर यासह एकूण 29 महापालिकांची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर केला जाईल. या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळात घडामोडी वाढल्या आहेत. इच्छुक उमेदवारांमध्येही लगबग वाढली आहे. राज्यात मुंबईसह पुणे आणि पिंपरी चिंचवड या महापालिकांची निवडणूक खूप महत्त्वाची आहे. याच निवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. पुणे तसेच पिंपरी चिंचवड येथे महायुती नसेल आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढू असे फडणवीस यांनी सांगितले आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर फडणवीस माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. (announcement)यावेळी बोलताना त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील महापालिका निवडणुकीवर भाष्य केले. आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करत आहोत. जास्तीत जास्त ठिकाणी भाजपा, शिवसेनेची युती होईल. काही ठिकाणी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीची युती होईल. एक-दोन ठिकाणी भाजपा आणि राष्ट्रवादीचीही युती होताना दिसेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

तसेच पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीवर बोलताना, (announcement)पुण्यामध्ये अजित पवार आणि आमच्यात चर्चा झालेली आहे. आम्ही दोघेही पुण्यातील मोठे पक्ष आहोत. भाजपाने पाच वर्षे चांगल्या पद्धतीने पुण्याचा विकास केलेला आहे. त्यामुळे कदाचित पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा समोरासमोर लढताना पाहायला मिळतील, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. तसेच ही लढत मैत्रीपूर्ण असेल. यात कुठेही कटुता नसेल, असेही फडणवीस यांनी सांगितले आहे.दरम्यान, पुण्याबरोबरच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. येथे महायुतीमध्ये जागावाटप आणि युतीच्या विषयावर चर्चा चालू आहे. त्यामुळे आता पुढे नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी…
इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी…
WhatsApp Call वर बोलताना तुमचं लोकेशन होईल ट्रॅक, आत्ताच करा ही सेटिंग