इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली (elections) असून चार प्रभाग समिती कार्यालयांमध्ये उमेदवारांना अर्ज भरण्याची सोय करण्यात आली आहे. आयुक्त आणि निवडणूक अधिकारी पल्लवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. प्रशासनाने निवडणुकीच्या प्रशासकीय कामकाजासाठी १७५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून कर विभागात ना हरकत दाखला देण्यासाठी खिडकीची व्यवस्था करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त सुषमा कोल्हे, उपायुक्त नंदू परळकर, तसेच अशोक कुंभार आणि विजय राजापुरे उपस्थित होते.

प्रथमच होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी एकूण २,४८,९०७ मतदार (elections) असून त्यात १,२५,६७२ पुरुष, १,२३,१८० महिला आणि ५५ इतर मतदार आहेत. मतदानासाठी ३०२ केंद्रे तयार करण्यात आली आहेत. इच्छुक उमेदवार त्यांच्या जवळच्या प्रभाग समिती कार्यालयात अर्ज भरू शकतात, ज्यासाठी चार कार्यालये निश्चित केली गेली आहेत.निवडणुकीसाठी ५ निवडणूक निर्णय अधिकारी, ५ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि १ राखीव निर्णय अधिकारी नेमण्यात आले आहेत. मतमोजणी राजीव गांधी भवन येथे होणार असून तेथून मतदान यंत्राचे वितरणही करण्यात येईल. २१ झोनल अधिकारी कामकाज पाहतील, त्यात ४ अधिकारी राखीव आहेत.

स्थिर पाहणी, चित्रीकरण आणि भरारीसाठी प्रत्येकी ४ पथके तयार केली गेली आहेत(elections) . एकूण निवडणूक पथके २३ आहेत. प्रशासनाने सर्व शासकीय विभागांना आदर्श आचारसंहिता काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश दिले असून तक्रारीसाठी टोल फ्री नंबर आणि व्हॉट्सअॅप नंबर सुरू करण्यात आला आहे.उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जुनी नगरपालिका इमारत, भारतमाता विद्यामंदिर, बाळासाहेब माने भवन आणि राजीव गांधी विद्यामंदिर या चार प्रभाग कार्यालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचा :
केळीच्या पानावर का खावे? केळीच्या पानावर खाण्याचे फायदे काय? जाणून घ्या
महेंद्रसिंह धोनी IPL ला रामराम ठोकणार; ‘या’ दिग्गज खेळाडूचा खळबळजनक दावा
वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा, आता तिकीट स्टेटस 10 तास आधीच पाहता येणार