कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी
जो शिक्षक फक्त ज्ञानदानाचे काम प्रामाणिकपणे करतो, विद्यार्थ्यांना घडवतो,(gift)उत्तम नागरिक बनवतो त्या देशाचे कल्याण होते. त्या देशाची सर्वांगीण प्रगती कोणीही थांबवू शकत नाही. एकूणच सांगायचं झाले तर प्रगतीचे मापदंड शिक्षणावर आणि शिक्षकांवर अवलंबून असतात. आपल्या देशात या शिक्षकालाच ज्ञान दाना ऐवजी इतर कामात गुंतवून ठेवले आहे. दिनांक पाच सप्टेंबर या एकाच दिवशी प्रतिवर्षी शिक्षक दिन साजरा करून इतर दिवशी त्याला अन्य कामासाठी शासन व्यवस्थेकडून गृहीत धरले जाते. आणि आता तर त्याची परीक्षा घेतली जाते. जे शिक्षक सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत त्यांनी सुद्धा ही परीक्षा दिली पाहिजे असा शासनाचा आग्रहच नव्हे तर आदेशच आहे. युती शासनामध्ये विनोद तावडे हे शिक्षण मंत्री असताना त्यांनी काही निर्णय घेतले. नंतर नियम करण्यात आले. शिक्षक पात्रता परीक्षा हा सुद्धा निर्णय त्यांनी घेतला होता आणि नंतर त्याचे नियमात रूपांतर करण्यात आले. ज्ञानदान करण्यासाठी आधीपासूनच काम करीत असलेला शिक्षक हा ज्ञानदानासाठी खरोखरच पात्र आहे का हे खरे तर शासनाला सुचलेले उशिरापणाचे शहाणपण आहे.

जो शिक्षक काही महिन्यातच सेवानिवृत्त होणार आहे (gift)त्याला सुद्धा ही परीक्षा अनिवार्य केलेली आहे. त्यातून शासनाला काय साध्य करावयाचे आहे हे समजून येत नाही.काही महिन्यापूर्वी महायुती सरकारने, जे शिक्षक “पात्रता परीक्षा” उत्तीर्ण होत नाहीत त्यांना घरचा रस्ता दाखवला जाईल असा कठोर निर्णय घेतला.या निर्णयाला राज्यातील शिक्षक संघटनांनी तीव्र विरोध केला. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आणि तेथेही शिक्षकांनी टीईटी परीक्षा दिलीच पाहिजे असे निर्देश न्यायालयाने दिले. जे शिक्षक अशा प्रकारची परीक्षा उत्तीर्ण होत नाहीत त्यांना बढती दिली जाणार नाही, प्रसंगी त्यांना सक्तीने निवृत्त केले जाईल असा इशाराच राज्य शासनाने दिला आहे. दिनांक ८ फेब्रुवारी या दिवशी शिक्षक पात्रता परीक्षा राज्यभरात एकाच वेळी घेतली जाणार आहे. आता या परीक्षेची पूर्वतयारी कशी करायची आणि निर्धारित वेळेत परीक्षा केंद्रामध्ये कसे पोहोचायचे हा यक्ष प्रश्न राज्यातील शिक्षकांना पडला आहे. कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे मतदान दिनांक सात फेब्रुवारी रोजी आहे आणि या मतदान प्रक्रियेत बहुतांशी शिक्षकांना समाविष्ट करण्यात आलेले आहे. मतदान प्रक्रिया पार पाडायची आणि लगेच दुसऱ्या दिवशी परीक्षा देण्यासाठी केंद्रात पोहोचायचे. अभ्यास कधी करायचा आणि परीक्षा कशी द्यायची हा कठीण प्रश्न आता या शिक्षकांनीच सोडवायचा आहे.
ज्ञानदान करण्यासाठी, सक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी, या देशातील (gift)आणि या राज्यातील शिक्षकांवर शासनाने जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्याकडून उत्तम विद्यार्थी घडवले गेले पाहिजेत ही अपेक्षा त्यांच्याकडून आहे. पण याच शिक्षकाला ज्ञानदानाचे काही तास कमी करून किंवा दिवस कमी करून इतर कामासाठीच जुंपले जाते. जनगणना, मतदार यादी तयार करणे, प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेत त्याला राबवून घेणे, इतर काही महत्त्वाच्या सर्वेक्षणात त्यांना कामाला लावणे, शासनाच्या काही महत्त्वकांक्षी योजना घराघरापर्यंत पोहोचवणे,लाभार्थ्यांची यादी बनवणे अशी कितीतरी कामे शिक्षकाकडून करवून घेतली जातात. त्यामुळे त्याला ज्ञानदान करण्यासाठी किंवा त्याची पूर्वतयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्याच्याकडून आपसूक ज्ञानदान प्रभावीपणे होत नाही. त्यामुळे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक महाविद्यालयीन शिक्षणाचा दर्जा घसरला आहे अशी सार्वत्रिक ओरड या देशात ऐकायला मिळते. आणि त्याला शासन व्यवस्था जबाबदार आहे.
कायम विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, अनुदानित अशा वेगवेगळ्या (gift)श्रेणीमध्ये शिक्षक काम करत असतो. शिक्षक होण्यासाठी त्याला डीएड, बी एड, एम एड अशा परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हाव्या लागतात. पदविका आणि पदवी असलेल्या शिक्षकांना शासकीय आणि खाजगी शिक्षण संस्थांमध्ये नोकरी मिळते. राज्यात कायम विनाअनुदानित संस्थांची संख्या बरीच आहे. या शिक्षणा संस्थांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना जेमतेम सुद्धा वेतन मिळते आहे असे नाही. आज नाहीतर उद्या आपण अनुदानित होऊ किंवा अंशत: अनुदान मंजूर होईल, अनुदान टप्प्याटप्प्याने वाढत जाईल या विश्वासावर शिक्षक काम करत असतात. अशा काही विनाअनुदानित शिक्षण संस्था आहेत की तेथील शिक्षक गेल्या दहा वर्षांपासून अक्षरशः विनावेतन काम करताना दिसून येतील. आणि अशा शिक्षकांकडून जबाबदार विद्यार्थी, हुशार विद्यार्थी घडवण्याची अपेक्षा
धरली जाते.
राज्यातील शिक्षकांच्या अशा अनेक रास्त मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत.(gift)निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगून या मागण्या मान्य केल्या जात नाहीत. आणि अशा विचित्र कोंडीत सापडलेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य केली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक कामात राज्यभरातील शिक्षक आहेत. या निवडणुकीसाठीचे मतदान दिनांक पाच फेब्रुवारी रोजी घेतले जाणार होते. पण आता अचानक मतदान दिनांक सात फेब्रुवारी रोजी होणार आहे. आणि शिक्षकांची टीईटी परीक्षा दिनांक 8 फेब्रुवारी रोजी आहे. मतदान प्रक्रिया पार पाडली गेली तरी ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम पर्यंत न्यायचे काम या यंत्रणेत जपलेल्या शिक्षकांनाच करावी लागते. त्याला मध्यरात्रीपर्यंतचा वेळ होऊ शकतो. अशा कामात अडकलेला शिक्षक दिनांक 8 फेब्रुवारी रोजी टीईटी परीक्षा देणार आहे. एकूणच त्याला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींना धक्का! या जिल्ह्यातील ६१ हजार महिलांचा लाभ बंद
इलेक्ट्रिक कारचे स्वप्न सामान्यांच्या आवाक्यात!
फॅन्स घाबरले ना… Virat Kohli चे Instagram अचानक बंद, नेमके काय झाले?