कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
देव आणि देवतांचे शिल्प/मूर्ती आधी कलाकार घडवत असतो. (goddesses)आणि त्याची प्रतिष्ठापना करताना पुरोहित मंत्रोत्याराने त्या शिल्पामध्ये, मूर्तीमध्ये प्राण फुंकत असतो. त्याला प्राणप्रतिष्ठा म्हणतात. पण महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला असा एक शिल्पकार होता, त्याला किमयागार म्हणता येईल. त्याचे नाव होते श्री. राम सुतार! त्यांच्या हातातच अशी कला होती की त्यांनी केलेले पुतळे जिवंत वाटत असत किंवा वाटतात. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याचे गोंडूर गाव जन्मभूमी असलेल्या राम सुतार यांची कर्मभूमी ही नवी दिल्ली होती. वयाची शताब्दी पार करणाऱ्या राम सुतार यांनी नवी दिल्लीतील नोएडा परिसरातील निवासस्थानी गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने शिल्पकलेतील”राम'” चे आता राहिला नाही असे म्हणता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईतील समुद्रात होणार असलेले नियोजित जागतिक स्मारक, प्रकरण न्याय प्रलंबित नसते तर राम सुतार यांच्याकडून ते नक्कीच झाले असते.

शिल्पकार, चित्रकार हा मुळातच जन्मजात असावा लागतो. (goddesses)नंतर त्याच्यावर शिक्षण, प्रशिक्षणाच्या माध्यमातून संस्कार होतात आणि मगच शिल्पकार आणि चित्रकार हे समाजात सिद्ध आणि प्रसिद्ध होत असतात. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक शिल्पकार आहेत आणि होते. कोल्हापुरात तर फार मोठी शिल्पकार परंपरा आहे. बाबुराव पेंटर, रवींद्र मेस्त्री, शामराव मेस्त्री, डोंगरसाने बंधू, बाळ चव्हाण यांची नावे शिल्पकार म्हणून आदराने घेतली जातात. त्यामुळे राम सुतार हे कोल्हापूरचेच आहेत असे अनेकांना वाटायचे. धुळे सारख्या जिल्ह्यात जन्म घेतलेल्या राम सुतार यांनी देशाच्या राजधानी जाऊन महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्रातील धुळे गावचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन पोहोचवले असे म्हणता येईल.
चित्रकाराचा कॅनव्हास हा मर्यादित असतो पण शिल्पकाराचे अवकाश मोठे असते.(goddesses) शिल्पकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणाऱ्या जेजे स्कूल ऑफ आर्ट सारख्या संस्था महाराष्ट्रात अनेक आहेत पण हे जेव्हा नव्हतं त्या काळात राम सुतार हे शिल्पकार म्हणून घडले आहेत. त्यांनी शिल्पकला ही खऱ्या अर्थाने एका उंचीवर नेऊन ठेवली. भव्य आणि दिव्य शिल्प घडवण्याचे भाग्य त्यांना लाभले. मध्यम वयात असताना त्यांचा एक हात काम देईनासा झाला. कुठल्यातरी आजाराचे निमित्त झाले. पण त्यावर मात करून ते शिल्प बनवत गेले. पुतळे बनवत गेले. दगडातून शिल्प बनवणे ही हस्तकला आहे पण ब्रांच किंवा पंचधातून पासून पुतळे बनवणे ही वेगळी कला आहे आणि वेगळे तंत्र ज्ञान आहे. आधी मेणापासून शिल्प बनवायचेनंतर त्याचे क्ले मॉडेल करायचे आणि मग प्रत्यक्षात पुतळा बनवण्यासाठी हाती घ्यायचा असे हे वेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान आहे.
अमेरिकेच्या स्वातंत्र्यदेवतेचे समुद्रातील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे शिल्प जगात सर्वात उंच समजले जाते. (goddesses)पण आता सरदार वल्लभभाई पटेल यांचे”स्टॅच्यू ऑफ युनिटी”हे शिल्प जगातले सर्वाधिक उंच समजले जाते आणि हे घडवले आहे राम सुतार यांनी.जगातील सर्वाधिक उंच शिल्प बनवण्याचा मान राम सुतार यांच्या माध्यमातून एका मराठी माणसाला मिळाला आहे.
भारतीय संसदेच्या आवारातील ध्यानस्थ अवस्थेतील महात्मा गांधीजी यांचा पुतळा, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजयासह देशातील, परदेशातीलअनेक राष्ट्रीय नेत्यांचे तसेच ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचे पुतळे आणि शिल्प राम सुतार यांच्याकडून घडवले गेले आहे. शिल्पकलेमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावलेले राम सुतार हे एकमेव शिल्पकार आहेत.

मुंबईच्या समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वाधिक उंचीचे जागतिकस्मारक (goddesses)हे राम सुतार यांच्याकडून केले जाणार होते. पण हे प्रकरण न्याय प्रलंबित असल्यामुळे आजही कागदावर आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी नंतर सर्वात भव्य दिव्य आणि उंच अशा प्रकारचे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतर राष्ट्रीय पातळीवरचे स्मारक होते. पण दुर्दैवाने राम सुतार यांचा हात या स्मारकासाठी आज उपलब्ध नाही. त्यांचे चिरंजीव अनिल सुतार हे आता त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत.राम सुतार यांच्या हातून घडलेल्या अद्वितीय शिल्पकलेची दखल केंद्र शासनाने घेऊन त्यांना आधी पद्मश्री आणि नंतर पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आणि त्यांना तो त्यांच्या निवासस्थानी जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदान केला.शिल्पकार म्हणून राम सुतार यांनी देशात आणि परदेशातअलौकिक असे काम केले आणि म्हणूनच त्यांच्या निधनानंतर देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. इतका मोठा सन्मान आणि इतके दीर्घ आयुष्यराम सुतार यांना मिळाले होते.
हेही वाचा :
इचलकरंजी :महाविकास आघाडीला धक्का: सतेज पाटलांच्या पदाधिकाऱ्याचा राहुल आवाडेंसोबत हातमिळवणी
इचलकरंजी : निवडणुका बदलल्या, चेहरे बदलले; पण समस्या तशाच — आश्वासनांच्या जाळ्यात अडकलेली वस्त्रनगरी
बाबा वेंगा : नाही टळणार ही भविष्यवाणी; आता सर्व बदलणार, एक दिवस सर्व जग हिंदू धर्म स्वीकारणार