कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
आयुष्य हे विचित्र असतं.वेडी वाकडी वळणं घेत असतं.(twists) इथं कुणी रावाचा रंक तर कधी रंकाचा राव होतो. कुणी आमदाराचा नामदार होतो आणि एक वेळ अशी येते की यापैकी काहीच राहत नाही. आता माणिकराव कोकाटे यांचं काय झालं बघा!कृषी खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांचा केवढा मोठा रुबाब! वाहनांचा ताफा, पुढे पोलिसांची पायलट कार, शासकीय विश्राम घामावर पोलिसांकडून दिली जाणारी मानवंदना, मुंबईत शासकीय निवासस्थान, कार्यकर्त्यांचा गराडा, हे सगळं वैभव आता त्यांनी गमावल्यात जमा आहे.पोलिसांना शरण जा! पोलीस ठाण्यात हजर राहा! अन्यथा तुम्हाला अटकेला सामोरे जावे लागेल! असा निर्वाणीचा इशारा देऊन उच्च न्यायालयाने कोकाटे यांची सन्मान वस्त्रे काढून घेतली आहेत. आणि अटकेची नामुष्की टाळण्यासाठी त्यांना रुग्णालयात ऍडमिट व्हावं लागलं आहे.

अभिनेते मास्टर भगवान यांचा”अलबेला”हा गाजलेला चित्रपट एकेकाळी बॉक्स (twists)ऑफिसवर धुमाकूळ घालून गेला आहे. त्यातील”किस्मत की हवा, कभी नरम कभी गरम”हे गाणे माणिकराव कोकाटे यांच्या आजच्या स्थितीशी साम्य दर्शक आहे.
माणिकराव कोकाटे हे विधी शाखेचे पदवीधर पण त्यांनी कोर्टात जाऊन कधी वकिली केली आहे हे कोणी पाहिलेले नाही. मात्र त्यांनी जनता न्यायालयाचा जोरदार प्रॅक्टिस केली. ते राजकारणात आले. आमदार झाले आणि नामदार सुद्धा झाले. कृषी खात्याचे ते मंत्री होते. पण शेतकऱ्याच्या शिवारात जाऊन त्याचीच औकात त्यांनी काढली. त्यांच्या इतका शेतकऱ्याचा अपमान कोणी केला नसेल.पण त्यांचे हे खाते त्यांच्याकडून काढून घेतलं. बळीराजाच्या शिवारातून थेट खेळाच्या मैदानावर ते आले म्हणजे ते क्रीडा खात्याचे मंत्री झाले.
सुमारे 30 वर्षांपूर्वी शासकीय कोट्यातून त्यांनी स्वतः सह चौघांना(twists) नाममात्र दरात प्राईम लोकेशन मध्ये सदनिका घेतल्या. त्या घेताना अल्प उत्पन्न गटातील असल्याची खोटी कागदपत्रे सादर केली. त्यांचा हा सदनिका घोटाळा तत्कालीन माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी चव्हाट्यावर आणला. त्यांनी थेट माणिकराव कोकाटे यांच्यासह काहीजणांच्यावर फौजदारी खटले दाखल करण्यास पोलिसांना भाग पाडले. या खटल्याचा निकाल काही महिन्यांपूर्वी लागला होता.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी त्यांना या गुन्ह्याबद्दल दोन वर्षांची सश्रम कारावासाची, तसेच दंडाची शिक्षा ठोठावली होती. त्यामुळे कोकाटे हे चांगलेच अडचणीत आले होते. मात्र त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या शिक्षेला आव्हान दिले. शिक्षेला स्थगिती मिळवली आणि आपले मंत्रिपद वाचवले होते. आता जिल्हा व सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम केल्यामुळे ते आता अधिकच अडचणीत आले आहेत.
कनिष्ठ न्यायालयाने दिलेली आणि वरिष्ठ न्यायालयाने (twists)अर्थात जिल्हा व सत्र न्यायालयाने कायम केलेली दोन वर्षांची शिक्षा
ही जामीन पात्र आहे. त्यांना जामीन मिळू शकतो. त्यासाठी ते मुंबई उच्च न्यायालयात गेले. पण त्यांच्या जामीन अर्जावर तात्काळ सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला आणि कायदा सर्वांना समान आहे. तुम्ही पोलीस ठाण्यात जाऊन हजर व्हा, अन्यथा तुम्हाला पोलिसांकडून अटक केली जाऊ शकते असे निर्देश दिल्यानंतर माणिकराव कोकाटे हे पोलीस ठाण्यात न जाता थेट रुग्णालयात दाखल झाले. तथापि त्यांना कोणत्याही क्षणी पोलिसांकडून अटक होऊ शकते. उच्च न्यायालयात जायचे, जामीन मिळवायचा आणि झालेल्या शिक्षेला स्थगिती मिळवायची आणि आपले मंत्रिपद सुरक्षित ठेवायचे हे तंत्र त्यांना यावेळी वापरता आलेले नाही किंवा उच्च न्यायालयाने तशी सवलत दिलेली नाही.दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयात कायम झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन माणिकराव कोकाटे यांच्याकडे असलेली खाती अजितदादा पवार यांच्याकडे सुपूर्त करण्याची विनंती केली. राज्यपालांनी ती मान्य ही केली. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे हे बिन खात्याचे मंत्री राहिले आहेत.
पोलिसांनी त्यांना अटक केली तर लोकप्रतिनिधी कायद्यान्वये त्यांची (twists)आमदारकी सुद्धा जाऊ शकते. एकूणच ते सामान्य पातळीवर येऊ शकतात.शासकीय कोट्यातून प्राईम लोकेशन मधील सदनिका मिळवण्यासाठी तयार केलेली खोटी कागदपत्रे
माणिकराव कोकाटे यांना 30 वर्षानंतर चांगलीच महागात पडलेली आहेत. ज्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात केले जात होते, त्यांच्या दौऱ्यात त्यांच्या वाहनाच्या पुढे पोलिसांची पायलट कारदिली जायची. आता त्यांनाच पोलिसांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी रुग्णालयात भरती व्हावे लागले आहे. यालाच “किस्मत की हवा” म्हणतात.आयुष्यातील अशा विचित्र वळणांना यापूर्वी अनेकांना जावे लागले आहे.आणि तेही कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा न करता.बॅरिस्टर बाबासाहेब भोसले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना भेटण्यासाठी विविध क्षेत्रातील लोकांचीगर्दी ऊसळायची. त्यांच्या अवतीभवती कार्यकर्त्यांचा गराडा असायचा. पोलिसांची सुरक्षा व्यवस्था मोठी असायची.

पण त्यांचे मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर ते एकदा कोल्हापूरला आले होते. (twists)शासकीय विश्राम धामावर त्यांचा मुक्काम होता. पण त्यांना भेटण्यासाठी एकही कार्यकर्ता आलेला नव्हता. शासकीय विश्राम धाम परिसरात अक्षरश: शुकशुकाट होता.
माजी मुख्यमंत्री म्हणून एकही लोकप्रतिनिधी त्यांना भेटण्यासाठी आला नव्हता. पोलिस किंवा स्थानिक प्रशासनानेही त्यांची तेव्हा दखल घेतली नव्हती.तब्बल अकरा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री पदावरून उतार झाल्यानंतर एकदा कोल्हापूरला आले होते. कोल्हापुरात काही लोकांच्या भेटीगाठी घेऊन मुंबईला परत जाण्यासाठी कोल्हापूरच्या रेल्वे स्थानकावर ते आले होते. रेल्वे स्थानकावरील एका बाकड्यावर रेल्वेची प्रतीक्षा करत ते एकटेच थांबले होते.
त्यांची कुणीही दखल घेतली नव्हती. याला सुद्धा “किस्मत की हवा, कभी नरम, कभी गरम”असे म्हणता येईल.
हेही वाचा :
राजकीय भूकंप! माणिकराव कोकाटेंना रुग्णालयातूनच बेड्या ठोकणार?
४ कोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी, राज्यात खळबळ