कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने, अजितदादा पवार यांनी मुंबई शहरात (Tension)माजी मंत्री नवाब मलिक यांना पुढे आणले, त्यांच्याकडे नेतृत्व दिले तर तुमचे आमचे जमणार नाही असे भाजपच्या वतीने स्पष्ट करण्यात आल्यानंतर महायुतीमध्ये काहीसा तणाव वाढला आहे.अजित दादा आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचीही नवाब मलिक यांनी अडचण करून टाकले आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना तेव्हाचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात नवाब मलिक आणि दाऊद इब्राहिम कुटुंबीय यांच्यात झालेल्या मालमत्ता खरेदी-विक्रीचे प्रकरण पुराव्यासह मांडले होते.दाऊद कुटुंबीयांच्या ताब्यात असणारी काही प्रॉपर्टी नवाब मलिक यांनी खरेदी केली आहे, या खरेदी विक्री प्रकरणातून आलेले पैसे टेरर फंडिंग साठी वापरले गेलेले आहेत, ते भारता विरोधी वापरलेले आहेत. आणि म्हणूनच त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी फडणवीस यांनी तेव्हा विधिमंडळ अधिवेशनात बोलताना केली होती.

अधिवेशनात हे प्रकरण गाजल्यानंतर नवाब मलिक यांना केंद्रीय तपास यंत्रणांनी अटक केली होती. (Tension)त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि ते जवळपास दीड ते दोन वर्षे तुरुंगात होते. रुग्णालयीन उपचारासाठी म्हणून त्यांना न्यायालयाने जामीन दिलेला आहे.दाऊद इब्राहिम कुटुंबीयांशी थेट संबंध असल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर असल्यामुळे भाजपच्या ब्लॅक लिस्टमध्ये ते आहेत.मुब‌ई महापालीकेचीनिवडणूक होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी अजितदादा पवार यांना नवाब मलिक यांच्याकडे मुंबईची सूत्रे द्यावयाची आहेत. मुंबई महापालिकेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवायची आहे. पण हे भाजपला मान्य नाही.नवाब मलिक यांना बाजूला करा तरच तुमच आमच जमेल. असे भाजपने अजितदादा यांना सांगितले आहे. नवाब मलिक यांच्या बद्दल घेतलेली भूमिका बदलावी आणि त्यांच्या नावाला सहमती द्यावी असा आग्रह अजितदादांनी फडणवीस यांच्याकडे धरलेला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनीच नवाब मलिक यांच्याविरुद्ध पुरावे गोळा करून (Tension) विधिमंडळ अधिवेशनात ठोस भूमिका घेतली होती. पण आत्ता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचे नेते म्हणून त्यांना घेतले तर भाजपची मोठी अडचण होणार आहे. ज्यांना तुम्ही देशद्रोही म्हणता त्यांच्याशीच तुमचं साठे लोटे कसे हा प्रश्न महाविकास आघाडी कडून किंवा ठाकरे बंधूंच्याकडून देवेंद्र फडणवीस यांना विचारला जाऊ शकतो.मलिकांच्या विरोधात फडणवीस यांनी पुरावे गोळा केले होते तेव्हा अजितदादा पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नव्हते. पण नंतर राजकीय संदर्भ बदलले. आणि अजित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हायजॅक करून तो भारतीय जनता पक्षाच्या वळचणीखाली आणला.

तेव्हा दादांच्या सोबत नवाब मलिकही आले. तुरुंगातून जामीन (Tension)मिळाल्यानंतर त्यांनी दादांना साथ दिली. नवाब मलिक यांचा सहभाग असलेली राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्षाला कशी काय चालली? असा सवाल उपस्थित केला गेल्यानंतर तो त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे अशी सोयीस्कर भूमिका भाजपने घेतली होती. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चालते, तर याच राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक, मुंबई महापालिका निवडणूक प्रचार प्रक्रियेत का नकोत? हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.नवाब मलिक हे देशद्रोही आहेत हा पुराव्यासह आरोप केल्यानंतर, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर, जेव्हा अजित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केले तेव्हा भाजपच्या वळचणी खाली येताना नवाब मलिक यांना दूर करा किंवा त्यांना पक्षातून अर्धचंद्र द्या अशी भूमिका भाजपने घ्यायला हवी होती.

पण राजकीय परिस्थिती वेगळी होती. नवाब मलिक यांचा सहभाग (Tension)असलेली राष्ट्रवादी काँग्रेस चालते तर मग मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मलिक यांच्या विषयी वेगळा विचार कशासाठी हा सुद्धा प्रश्न कोणी उपस्थित केला तर त्यात वावगे काहीच नाही.मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती च्या घटक पक्षाचे मुंबईचे नेते म्हणून नवाब मलिक हे प्रचारात उतरले तर भाजपची अडचण होणार आहे. तुम्ही देशद्रोह्याबरोबर कसे या प्रश्नाचे उत्तर भाजपाकडे काय असणार? नवाब मलिक नकोत ही भाजपची भूमिका मान्य केली तर महायुतीमध्ये अजित दादा पवार हे भाजपच्या दबावाखाली आहेत हे स्पष्ट होणार आहे किंवा याबद्दल चर्चा होणार आहे आणि त्यामुळेच त्यांची अधिक गोची होणार आहे.

शरद पवार यांना एकाकी पाडून अजित दादा पवार यांनी 40 आमदारांसह स्वतंत्र (Tension)भूमिका घेतली. तेव्हा नवाब मलिक हे टेरर फंडिंग आरोपावरून तुरुंगात होते.अजितदादा हे देवेंद्र फडणवीस यांच्या सत्तेत भागीदार झाले, तेव्हाही नवाब मलिक हे तुरुंगातच होते. पण जेव्हा त्यांना जामीन मिळाला आणि त्यांनी मी अजितदादा पवार यांच्याबरोबर असल्याचे स्पष्ट केले तेव्हा भाजपची अडचण झाली. आता राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचाराची सूत्रे मुंबईमध्ये मलिक यांच्याकडे दिली गेली तर भाजप नैतिकदृष्ट्या अडचणीत येणार आहे आणि म्हणूनच नवाब नकोत ही भूमिका त्यांनी घेतलेली दिसते.

हेही वाचा :

केळीच्या पानावर का खावे? केळीच्या पानावर खाण्याचे फायदे काय? जाणून घ्या

महेंद्रसिंह धोनी IPL ला रामराम ठोकणार; ‘या’ दिग्गज खेळाडूचा खळबळजनक दावा

वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा, आता तिकीट स्टेटस 10 तास आधीच पाहता येणार