टी20 वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाला दुखापतींचा फटका बसत असल्याचं चित्र दिसत आहे. (T20 World Cup) तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोन्ही खेळाडू दुखापतीतून सावरून संघात परतले असताना आता वेगवान गोलंदाज हर्षित राणाच्या दुखापतीने संघाच्या चिंतेत भर घातली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात हर्षितच्या गुडघ्याला दुखापत झाली असून त्यामुळे तो या स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दुखापतीमुळे हर्षितचं टी20 वर्ल्डकप खेळण्याचं स्वप्न अधुरंच राहण्याची शक्यता असून क्रीडा वर्तुळात त्याच्या जागी कोणाची निवड होणार याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार हर्षित राणाच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला (T20 World Cup) संघात स्थान दिलं जाण्याची दाट शक्यता आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार बीसीसीआयने सिराजची निवड केली असल्याची चर्चा असून मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. कर्णधार सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत हर्षित स्पर्धेतून पूर्णपणे बाहेर गेलेला नसल्याचं स्पष्ट केलं होतं, मात्र त्याची शारीरिक स्थिती समाधानकारक नसल्याचंही सूचित केलं होतं. त्यामुळे हर्षित स्पर्धेला मुकणार, असं गृहीत धरलं जात आहे.
जर मोहम्मद सिराजची निवड निश्चित झाली, तर तो दीड वर्षांनंतर टीम इंडियाच्या टी20 संघात पुनरागमन करेल. सिराजने शेवटचा टी20 सामना जुलै 2024 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. त्यानंतर तो कसोटी आणि वनडे संघात नियमित खेळत असला तरी टी20 संघात त्याला संधी मिळालेली नव्हती. आतापर्यंत सिराजने भारतासाठी 16 टी20 सामने खेळत 14 विकेट घेतल्या असून त्याचा इकॉनॉमी रेटही 8 पेक्षा कमी आहे.
तरीही सिराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये (T20 World Cup) स्थान मिळेल की नाही, याबाबत साशंकता आहे. कारण भारताकडे आधीच हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह यांसारखे अनुभवी वेगवान गोलंदाज उपलब्ध आहेत आणि बुमराह सर्व सामने खेळणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्यामुळे सिराजला संघात स्थान मिळालं, तरी त्याला अंतिम 11 मध्ये संधी मिळणं आव्हानात्मक ठरणार आहे. मात्र अनुभवी गोलंदाज म्हणून त्याची उपस्थिती टीम इंडियासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते.
हेही वाचा :
सनी देओलचा ‘बॉर्डर 2’ ओटीटीवर येणार! कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या सविस्तर
मुंबई हादरली; हायड्रोजन फुग्यांचा स्फोट, 3 जण गंभीर भाजले – धक्कादायक VIDEO समोर