१४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा (Under-19 World Cup) गाजवली आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळींपैकी एक खेळी शुक्रवारी (५ फेब्रुवारी) केली. शुक्रवारी १९ वर्षांखालील वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात वैभवने भारतासाठी इंग्लंडविरुद्ध पावणेदोनशे धावांची खेळी करत इतिहास घडवला आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी (Under-19 World Cup) उतरलेल्या भारतीय संघाने सलामीवीर ऍरॉन जॉर्जची विकेट ९ धावांवर गमावली होती. पण आयुष म्हात्रेने कर्णधार आयुष म्हात्रेसोबक १४२ धावांची भागीदारी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. आयुष अर्धशतकानंतर ५३ धावांवर बाद झाला होता.

पण तरी नंतरही वैभवने लय कायम ठेवलीच पण धावांची गतीही वाढवली. (Under-19 World Cup) त्याने आधी ५५ चेंडूत शतक केले आणि नंतर ७१ चेंडूतच दीडशतकही पूर्ण केले. त्याला दुसऱ्या बाजूने वेदांत त्रिवेदी साथ देत होता. वैभव ज्या वेगात धावा करत होता, त्यावरून तो द्विशतक करेल, असेच चित्र दिसत होते.

मात्र अखेर (Under-19 World Cup) त्याचा इंग्लंडच्या मार्गातील अडथळा मॅनी लम्सडेनने दूर केला. २६ व्या षटकात त्याचा झेल थॉमस ऱ्यूने घेतला. वैभवने ८० चेंडूत १७५ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १५ चौकार आणि १५ षटकार मारले. त्याच्या या खेळीमुळे भारताने ५० षटकात ९ बाद ४११ धावांचा डोंगर उभा केला.

हेही वाचा :

फक्त 1 रुपयासाठी या अभिनेत्याने नाकारलेला अमिताभ बच्चन यांचा चित्रपट

पाऊस पडूनही राज्याच्या अनेक भागात आतापासूनच पाणी टंचाई

प्रसिद्धीसाठी काय पण! हॉटेलमध्ये वेटरने मुलीसमोर अशी दाखवली क्रिएटिविटी पाहून तुम्हाला येईल संताप, Video प्रचंड व्हायरल