आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया अंडर-19 ने इतिहास रचत (final match) आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कप 2026 चा किताब पटकावला आहे. अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडवर एकतर्फी आणि दमदार विजय मिळवत सहाव्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफी आपल्या नावे केली.हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर झालेल्या या अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडसमोर तब्बल 412 धावांचं आव्हान उभं केलं. भारताच्या या भक्कम धावसंख्येमागे वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजी निर्णायक ठरली. वैभवने 175 धावांची अफलातून खेळी करत इंग्लंडच्या गोलंदाजांची पुरती धुलाई केली.

विजयी धावांचा (final match) पाठलाग करताना इंग्लंडचा संघ भारतीय गोलंदाजांसमोर पूर्ण 50 षटकंही तग धरू शकला नाही. भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत इंग्लंडला 40.2 षटकांत 311 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे भारताने अंतिम सामन्यात तब्बल 100 धावांनी विजय मिळवला.या विजयासह भारताने अंडर-19 वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव सहाव्यांदा कोरलं आहे. विशेष म्हणजे, अंतिम सामन्यात इंग्लंडवर मात करत वर्ल्ड कप जिंकण्याची भारताची ही दुसरी वेळ ठरली आहे. याआधी 5 फेब्रुवारी 2022 रोजी भारताने इंग्लंडला पराभूत करत पाचव्यांदा अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला होता.
आयुष म्हात्रेचं संयमी नेतृत्व, वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजी आणि गोलंदाजांची धारदार कामगिरी यामुळे हा विजय अधिक संस्मरणीय ठरला असून, भारतीय क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरली आहे.

हेही वाचा :

फक्त 1 रुपयासाठी या अभिनेत्याने नाकारलेला अमिताभ बच्चन यांचा चित्रपट

पाऊस पडूनही राज्याच्या अनेक भागात आतापासूनच पाणी टंचाई

प्रसिद्धीसाठी काय पण! हॉटेलमध्ये वेटरने मुलीसमोर अशी दाखवली क्रिएटिविटी पाहून तुम्हाला येईल संताप, Video प्रचंड व्हायरल