टी२० वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी तीन सामने होणार आहे.(player) याच दिवशी भारताचा यूएसए विरोधात सामना होणार आहे. मुंबई वानखेडे स्टेडियमवर सायंकाळी ७ वाजता सामना सुरू होणार आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह सामना खेळणार नाही. मागील सीरीजमध्ये अभिषेक शर्मासोबत ओपनिंग करणारा संजू सॅमसनला देखील बाहेर बसावं लागणार आहे. त्याच्या ऐवजी ईशान किशन ओपनिंग करताना दिसणार आहे.

मीडिया वृत्तानुसार, जसप्रीत बुमराहची तब्येत बिघडली आहे.(player) त्यामुळे जसप्रीत यूएसए विरोधात खेळताना दिसणार नाही. हर्षित राणा देखील दुखापत ग्रस्त झाल्याने स्पर्धेच्या बाहेर गेला आहे. बीसीसीआयने मोहम्मद सिराजचा देखील संघात समावेश करण्यात आलाय.बु्मराहला व्हायरल आजार झाला आहे. त्यामुळे बीसीसीआय देखील बुमराहला खेळण्यासाठी मैदानात पाठवणार नाही. सामन्याच्या एक दिवस आधी देखील बुमराह सरावासाठी मैदानात उतरला नव्हता. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात देखील खेळण्याची शक्यता धुसर आहे.

टी२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेच्या आधी झालेल्या सीरीजमध्ये संजू सॅमसन (player) आणि अभिषेक शर्मा ओपनिंग करायचे. परंतु प्रत्येक सामन्यात संजूने भारतीयांना नाराज केलं. त्याने कोणत्याही सामन्यात चांगली कामगिरी केली नाही. सीरीजच्या शेवटच्या सामन्यात ईशान किशनने विकेटकिपिंग केली होती. त्यामुळे आज ईशान किशन आणि अभिषेक शर्मा हे दोघे यूएसए विरोधात ओपनिंग करण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधात देखील सराव सामन्यात दोघे सलामीला उतरले होते.अभिषेक शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या,शिवम दुबे, रिंकू सिंह, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज

हेही वाचा :

आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा

अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

‘या’ जन्मतारखेला जन्मलेली लोक प्रचंड नशीबवान असतात; गुरू ग्रहाची असते मोठीEdit