उत्तर बंगळुरूमध्ये नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक (shocking) घटना समोर आली आहे. एका खासगी शाळेत प्रिन्सिपल म्हणून कार्यरत असलेल्या महिलेने आपल्या सासऱ्यावर वारंवार लैंगिक आणि शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपासाला सुरुवात केली असून राज्य महिला आयोगानेही घटनेची दखल घेतली आहे.
पीडित महिला 2007 पासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. तिच्या तक्रारीनुसार, लग्नानंतर सुरुवातीची काही वर्षे सर्व काही सुरळीत होते. मात्र 2020 पासून सासऱ्याने तिच्याशी अयोग्य वर्तन करण्यास सुरुवात केली. त्यावेळी संपूर्ण कुटुंब एकाच अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये राहत होते. महिला घरात एकटी असताना आरोपी घरात येऊन तिच्याशी गैरवर्तन करत असल्याचा आरोप तिने केला आहे.

तक्रारीत महिलेने नमूद केले आहे की, या प्रकाराबाबत (shocking) कुणाला सांगितल्यास मुलांना इजा करण्याची धमकी आरोपीकडून दिली जात होती. या भीतीमुळे ती बराच काळ गप्प राहिली. परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली होती. मात्र छळ सुरूच राहिल्यानंतर अखेर तिने पतीला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबातील ज्येष्ठांनी हस्तक्षेप करून आरोपीला समज दिली. काही काळासाठी त्याचे वर्तन थांबले, परंतु नंतर पुन्हा त्रास देण्यास सुरुवात झाल्याचा आरोप आहे.

महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपी अनेकदा स्वतःच्या हस्ताक्षरातील अश्लील (shocking) मजकूर असलेली पत्रे तिला देत असे आणि ती वाचल्यानंतर परत घेत असे. हा छळ 2020 पासून डिसेंबर 2025 पर्यंत सुरू होता, असा तिचा दावा आहे. 15 डिसेंबर 2025 रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास ती घराबाहेर पडत असताना अपार्टमेंटच्या लिफ्टजवळ आरोपीने पुन्हा तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यावर आरोपीने तिच्या पोटात मारहाण करून तेथून पळ काढल्याचा आरोप तिने केला आहे.
सध्या पोलिसांकडून संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू असून पुरावे गोळा करण्याचे काम चालू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण सत्य समोर येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

मुलांसाठी विज्ञान-समर्थित आरोग्यपूरक: ‘वासु सुवर्णप्राशन ड्रॉप्स’चे फायदे आता क्लिनिकली मान्य

कुंडलीतील बुध ग्रह कमकुवत झाल्यास आयुष्यावर कसा होतो परिणाम ?

मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या, सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?