काकी ही आई समान असते. पण या पवित्र नात्याला कलंक लावणारी घटना घडली आहे.(studying)काकी पुतण्याच्या प्रेमात पडली. दोघे नात्याच्या सर्व मर्यादा विसरले. त्यांना आपापल्या वयाचं सुद्धा भान राहिलं नाही. दोघे परस्परांच्या प्रेमात इतके बुडालेले की, घरातून पळून गेले. महत्वाचं म्हणजे हा पुतण्या 9 व्या इयत्तेत आहे. मागच्या 10 दिवसांपासून पोलीस आणि कुटुंबीय दोघांचा शोध घेत होते. अखेरीस पोलिसांना यश मिळालं. पोलिसांनी या काकी आणि पुतण्याला शोधून काढलं. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील हे प्रकरण आहे. या प्रकरणावरुन विभागात उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. दोघे लग्न करण्याच्या तयारीत होते, असं चौकशीत निष्पन्न झालय.

गोरखपुरच्या पीपीगंज पोलीस ठाणे क्षेत्रात या प्रकरणात तक्रार दाखल झाली होती.(studying) 10 दिवसांपूर्वी काकी आणि पुतण्या फरार झाले होते. 15 वर्षाचा मुलगा घरात आई-वडिल आणि 35 वर्षीय काकीसह राहत होता. काका नोकरीनिमित्त बाहेर असायचा. याच दरम्यान पुतण्या आणि काकीमध्ये प्रेमसंबंध बहरु लागले. ते दिवसभर बोलायचे. काकी आणि पुतण्या नात्यात असल्याने बाहेरच्या माणसाला कधी त्यांच्यावर संशय आला नाही.
26 जानेवारीला दोघे अचानक बेपत्ता झाले. कुटुंबियांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला.(studying) पण त्यांचा शोध लागला नाही. त्यानंतर नातेवाईकांनी 10 दिवसांपूर्वी पीपीगंज पोलीस ठाणे क्षेत्रात तक्रार दिली. लवकरात लवकर दोघांना शोधून काढण्याची मागणी केली. तक्रार मिळताच पोलीस टीम एक्टिव झाल्या. सर्विलांस आणि सीसीटीव्हीच्या मदतीने दोघांना शोधण्याचा प्रयत्न झाला. इथे कुटुंबिय सुद्धा दोघांचा दिवस-रात्र शोध घेत होते.
काहीतरी अघटित झाल्याची शक्यता लक्षात घेऊन पीसीगंज पोलीस ठाणे क्षेत्रात दोघे(studying)बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. सोमवारी पोलिसांनी या काकी-पुतण्याच्या जोडीला अटक केली. पोलीस चौकशीत पुतण्याने सांगितलं की, “ते लग्न करण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी त्यांना पकडलं. पोलिसांनी दोघांना पीपीगंज पोलिसांकडे सोपवलं. सूचना मिळताच नातेवाईक पोलीस ठाण्यात पोहोचले”नातेवाईकांनी पोलिसांना दोघांविरोधात कायदेशीर कारवाई करु नये अशी विनंती केली आणि त्यांना आपल्यासोबत घेऊन गेले. चौकशीत पुतण्याने सांगितलं की, त्याला काकीसोबत लग्न करायचं होतं. दोघे लग्नाची तयारी करत होते.
हेही वाचा :
हम दो, हमारे दो दर्जन… ओवैसींच्या पक्षाच्या नेत्याचा नारा, दिलं अजब कारण; देशभर चर्चा
प्रार्थना बेहेरेने सांगितलं मुंबई सोडण्याचं कारण, खुलासा करत म्हणाली- अनेकदा तिथे….
IND vs PAK सामन्यासाठी बांगलादेशचा भारताच्या बाजूने कौल, तर पाकिस्तानने ठेवल्या तीन अटीEdit